एक्स्प्लोर
Advertisement
राधिका आपटेच्या व्हायरल व्हिडीओला तुफान प्रतिसाद
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा नवा व्हिडीओ सध्या यू ट्यूबवर व्हायरल होत आहे. 'फाइंड युआर ब्युटीफूल' या व्हिडीओ तरुणी आणि महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय झाला आहे. त्यांचा हा प्रतिसाद पाहून राधिका खूपच आनंदी आहे.
"ही फारच आनंदाची गोष्ट आहे की, व्हिडीओ पाहिल्यानंतर बऱ्याच मुली माझ्याकडे आल्या. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला अतिशय चांगलं वाटत आहे. माझ्यात जी सर्वात सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे माझं मन, असं राधिका एका मुलाखतीत म्हणाली.
राधिका आपटेने मागील आठवड्यात 'अनबल्श्ड' नावाने एक व्हिडीओ सीरिज सुरु केली आहे. या व्हिडीओमध्ये बालपणीचा फोटो पाहून स्वत:च्या शरीर आणि सौंदर्याबाबत सल्ला देत आहे. यू आर ब्युटीफूल आणि "अपनी जिंदगी के छोटे बड़े हिस्से किराए पे मत देना."
राधिका आपटेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यू ट्यूबवर सुमारे 5.5 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
दरम्यान, राधिकाने दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटात स्वत:चा ठसा उमटवला आहे. 'हंटर', 'बदलापूर' आणि 'मांझी-द माऊंटन मॅन'मधल्या तिच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. राधिका सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत तामिळ चित्रपट 'कबाली' ची शूटिंग करत आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
नांदेड
Advertisement