Radhika Apte : बॉलिवूडमध्ये अभिनयाला नाही, तर तरुण दिसण्याला अधिक महत्त्व; राधिका आपटेचा गौप्यस्फोट
Radhika Apte : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे एका मुलाखतीत म्हणाली,"तरुण दिसण्यासाठी कधीही सर्जरी केली नाही, पण संघर्ष करावा लागला".
Radhika Apte on Ageism in Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) आजवर अनेक दर्जेदार सिनेमांत काम करत आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली आहे. उत्कृष्ट अभिनयासोबत सडेतोड उत्तरासाठीदेखील राधिका लोकप्रिय आहे. नुकतीच ती तिच्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली,"अनेकदा सिनेमातील भूमिकेसाठी मला रिजेक्ट करण्यात आले आहे".
राधिका आपटे म्हणाली,"बॉलिवूडमध्ये वयाला खूप महत्त्व आहे. बॉलिवूडमध्ये तुमच्या अभिनयापेक्षा तु्म्ही किती तरुण दिसता या गोष्टीला महत्त्व आहे. त्यामुळेच तरुण दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री सतत आपल्या शरीराच्या विविध भागांच्या सर्जरी करत असतात. मलादेखील अनेकदा सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण मी सर्जरी केलेली नाही".
तरुण दिसण्यासाठी राधिकाने कधीही सर्जरी केली नाही
एका मुलाखतीदरम्यान राधिका आपटे म्हणाली,"तरुण दिसण्यासाठी मी आजवर सर्जरी केलेली नाही. पण बॉलिवूडमध्ये वयाला खूप किंमत आहे. अनेक सिनेमांसाठी तरुण अभिनेत्रीच हव्या असतात हे सत्य नाकारता येणार नाही". फक्त भारतीय सिनेसृष्टीतच नाही तर जगभरात अनेक महिला या गोष्टी विरोधात लढत आहेत.
राधिकाचा 'मोनिका, ओ माय डार्लिंग' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात ती राजकुमार राव आणि हुमा कुरॅशीसोबत दिसली होती. याआधी ती सैफ अली खान आणि हृतिक रोशन स्टारर 'विक्रम वेधा' या बहुचर्चित सिनेमात झळकली होती. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात तिचे दोन्ही सिनेमे कमी पडले.
View this post on Instagram
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या राधिका आपटेचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. केवळ चित्रपटच नाही तर, राधिकाला ओटीटी विश्वाची राणी म्हटले जाते. अनेक वेब सीरिजच्या माध्यमातून तिने आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. राधिका 2012 साली संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्नबंधनात अडकली आहे.
संबंधित बातम्या