R D Burman Death anniversary : सुरांचा बादशाह आर. डी बर्मन यांना 'पंचमदा' नाव कसं मिळालं? जाणून घ्या...
R D Burman : भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार आर.डी.बर्मन यांनी संगीत क्षेत्रात नव-नवीन प्रयोग केले आहेत.
R D Burman : भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणजे आर.डी बर्मन (R D Burman). मनोरंजनसृष्टीत आर.डी बर्मन 'पंचमदा' या नावाने लोकप्रिय आहेत. 27 जून 1939 रोजी त्यांचा जन्म झाला तर 4 जानेवारी 1994 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील एका युगाचा अंत झाला.
आर.डी बर्मन यांना 'पंचमदा' नाव कसं पडलं?
सिनेसृष्टीत आर.डी बर्मन 'पंचमदा' (Pancham Da) या नावाने ओळखले जात. आर.डी बर्मन यांना अशोक कुमार (Ashok Kumar) म्हणजेच दादामुनी प्रेमाने 'पंचमदा' या नावाने हाक मारत असे. दादामुनींनी त्यांचे नाव 'पंचम' असे ठेवले होते. पण पुढे ते 'पंचमदा' या नावाने लोकप्रिय झाले. तसेच ते 'तुललु' या नावानेदेखील ओळखले जात.
पंचमदांनी वयाच्या नवव्या वर्षी पहिलं गाणं संगीतबद्ध केलं. त्यांना त्यांच्या वडिलांकडून संगीताचा वारसा लाभला होता. त्यांचे वडील एस. डी. बर्मन हेदेखील लोकप्रिय संगीतकार होते. त्यांच्या 'मेरे सपनों की रानी कब आएगी तू, 'सिर जो तेरा चकराए', 'कोरा कागज था ये मन मेरा' या गाण्यांत पंचमदांचादेखील सहभाग होता.
प्रयोगशील आर.डी बर्मन...
'चुरा लिया' या गाण्यात आर. डी. बर्मन यांनी ग्लासवर चमचा मारुन निर्माण होणाऱ्या ध्वनीचा वापर केला होता. पावसाचा आवाज ध्वनिमुद्रित करण्यासाठी त्यांनी एक अख्खी रात्र पावसात घालवली होती. तसेच 'अब्दुल्ला' या गाण्यासाठी त्यांनी बांबूला फुगा बांधून त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीचा संगीतासाठी वापर केला होता.
सुरांचा बादशाह यांनी तीन दशके आपल्या संगीताने बॉलिवूडवर राज्य केलं आहे. आर. डी. बर्मन यांचे चाहते जगभरात आहेत. आर.डी, बर्मन यांना बालपणीच संगीताची गोडी लागली. 1956 साली 'फंटूश' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांची अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत.
आर. डी. बर्मन यांची गाजलेली गाणी
आर. डी. बर्मन यांच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये 'सर जो तेरा चक्रे' (Sar Jo Tera Chakraye), 'मेरे सपनों की रानी कब आएगी तू' (Mere Sapnon Ki Rani), 'कोरा कागज था ये मन मेरा' अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे. आर. डी. बर्मन यांनी 'भूत बंगला' आणि 'प्यार का मौसम' या सिनेमात अभिनयदेखील केला आहे. त्यांनी संगीतविश्वाला नवीन परिभाषा दिली आहे. त्यांच्या गाण्यांची रसिक प्रेक्षकांना चांगलीच जाण आहे.
संबंधित बातम्या