Pushpa 2 Making Video: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ची झलक, BTS व्हिडीओ समोर; जंगलातील सेटचं दृश्य करतंय हैराण
Pushpa 2 Making Video: सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रुल'चा BTS व्हिडिओ समोर आला आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

Pushpa 2 Making Video: अल्लू अर्जुन (Allu Arjun), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि फहद फासिल (Fahadh Faasil) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) जगभरात रिलीज होण्यासाठी आता फक्त एकच दिवस शिल्लक आहे. हा बिग बजेट अॅक्शन ड्रामा इंटरेस्टिंग बनवण्यासाठी निर्मात्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही, याची प्रचिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या BTS व्हिडीओवरुन (BTS Video) येते. एकीकडे चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये बॉक्स ऑफिसवर (Box Office) आधीच दबदबा निर्माण केला आहे. तर, दुसरीकडे या चित्रपटाचा BTS व्हिडीओ सर्वांच्या अंगावर शहारे आणण्याचं काम करतोय. 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी BTS व्हिडीओ शेअर केला असून जंगलातील सेट पाहून हैराण झाले आहेत. एकंदरीतच पुष्पा 2 बॉक्स ऑफिस गाजवणार यात काही शंकाच उरत नाही.
तब्बल 134 सेकंदांचा हा व्हिडीओ चित्रपटाच्या आऊटडोअर शूटचा आहे, ज्यामध्ये सुकुमार संपूर्ण टीम आणि क्रू सोबत कसं रात्रंदिवस काम करत आहेत, हे दाखवण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ :
'पुष्पा 2' च्या दमदार, धमाकेदार व्हिज्युअल्समागे सुकुमार
पुष्पा 2 च्या BTS व्हिडीओमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीमची मेहनत स्पष्टपणे दिसून येते. यामध्ये दिग्दर्शक सुकुमार हे जणू एखाद्या कॅन्व्हासवर काहीतरी उतरवत असल्याचा भास होता. छोट्या-छोट्या कलाकारांचाही चित्रपटाचा प्रवास घडवण्यात मोठा वाटा आहे. तसेच, तुम्ही BTS व्हिडीओमध्ये 'पुष्पा 2' च्या दमदार, धमाकेदार व्हिज्युअल्समागे सुकुमार असल्याचं स्पष्टपणे पाहू शकता.
रिलीजपूर्वीच Box Office वर पुष्पाचाच दबदबा
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे दोनच दिवस उरले आहेत. पण, फक्त रिलीजपूर्वीच त्याची क्रेझ संपूर्ण जगभरात पसरली आहे. त्यामुळे सुकुमार दिग्दर्शित मास अॅक्शन ड्रामा असलेल्या या चित्रपटाची तिकिटं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये हॉटकेकप्रमाणे विकली जात आहेत. प्री-तिकीट सेलमध्ये या चित्रपटानं फायटर आणि कल्की 2898 एडी सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचेही रेकॉर्ड मोडले आहेत. एवढंच काय तर, 'पुष्पा- 2 द रूल'च्या अॅडव्हान्स बुकिंगमुळे पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 426 कोटी रुपयांची वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























