एक्स्प्लोर

Pushpa 2 New Poster: फहाद फासिलच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना गिफ्ट; 'पुष्पा-2' चं नवं पोस्टर रिलीज

अभिनेता फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) वाढदिवसानिमित्त पुष्पा-2 (Pushpa 2) चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे.

Pushpa 2 New Poster:    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 या चित्रपटामधील अल्लू अर्जुनच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. आता अभिनेता फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) वाढदिवसानिमित्त पुष्पा-2 मधील पुष्पा चित्रपटाच्या टीमनं चाहत्यांना एक गिफ्ट दिलं आहे. नुकताच सोशल मीडियावर पुष्पा-2 या चित्रपटातील  भंवर सिंह शेखावत या भूमिकेच्या लूकचा फोटो शेअर करण्यात आला आहे.  भंवर सिंह शेखावत ही भूमिका  फहाद फासिल हा साकारतो. 

फहाद फासिलच्या भंवर सिंह शेखावत या भूमिकेच्या लूकचा फोटो पुष्पा मुव्ही या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, 'Pushpa2 The Rule च्या टीमकडून  फहाद फासिलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, भंवर सिंग शेखावत सर पुन्हा एकदा  मोठ्या पडद्यावर येणार आहेत.' पुष्पा-2 च्या या नव्या पोस्टरमधील  फहाद फासिलच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  

पाहा पोस्टर:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pushpa (@pushpamovie)

'कायथुम दुरथ' या चित्रपटामधून फहादनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानं 'सी यू सून', 'जोजी' आणि 'मालिक' या चित्रपटांमध्ये काम केलं. आता फहादच्या पुष्पा 2  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

कधी रिलीज होणार पुष्पा-2?

पुष्पा 2 द रुल या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून यात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्सने केली आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

पुष्पा द राइज (Pushpa: The Rise - Part 1) हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  पुष्पा द राइज  या चित्रपटातील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा  या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता पुष्पा 2  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

काही दिवसांपूर्वी पुष्पा द रुल या चित्रपटाचा एक व्हिडीओ पुष्पा चित्रपटाच्या टीमनं सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये पुष्पा हा तुरुंगातून फरार झाल्याचे दिसला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pushpa 2: गळ्यात लिंबाची माळ, भरजरी साडी अन् हातात बंदुक; पुष्पा-2 मधील अल्लू अर्जुनच्या लूकनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget