Pushpa 2 Break Records: अल्लू अर्जुनच्या स्टारडमनं शाहरुख खान, राजकुमार रावला पछाडलं; 'पुष्पा 2'चा हिंदीतही नवा विक्रम
Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या फिल्मनं बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे.
Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) हा चित्रपट रिलीज होऊन दोन आठवडे उलटले आणि चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. पुष्पाची जादू पूर्ण बॉक्स ऑफिसवर (Box Office) पसरली असून दररोज अनेक नवनवे विक्रम मोडीत काढत आहे. पुष्पा 2 फक्त दक्षिणेतच नाही, तर हिंदीतही कमाई करत आहे. पुष्पा 2 नं देखील शाहरुख खानच्या जवान आणि श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 ला मागे टाकलं आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं कोणते रेकॉर्ड मोडलेत? पाहुयात एका क्लिकवर...
पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांचा अभिनय पाहण्यासारखा आहे. या तिघांचाही अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे. त्यामुळे चित्रपटांची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे.
View this post on Instagram
पुष्पा 2 नं मोडले जवानचे सर्व रेकॉर्ड
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 नं दुसऱ्या आठवड्यात शानदार कमाई केली आहे. चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यात हिंदीमध्ये शानदार कमाई करणाऱ्या अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे. 125 कोटींसह पुष्पा 2 पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या नंबरवर स्त्री 2-92.90 कोटी, तिसऱ्या नंबरवर गदर 2 (90.50 कोटी), चौथ्या नंबरवर अॅनिमल (87.50 कोटी), पाचव्या क्रमांकावर जवान (82.50 कोटींवर) आहे. पुष्पा 2 नं हिंदीच्या सर्वच्या सर्व मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत.
बॉक्स ऑफिसवर किती कमाई?
पुष्पा 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, 11 व्या दिवशी चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. भारतातील सर्व भाषांमध्ये या चित्रपटाचं कलेक्शन आता 900 कोटींवर पोहोचलं आहे. आता पुष्पा 2, बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडण्यात व्यस्त आहे. बाहुबली 2 नं भारतात 1030.42 कोटी रुपये कमावले होते. पुष्पा 2 ची कमाई 900 कोटींच्या पुढे गेली आहे. आता पुष्पा 2 बाहुबली 2 चा रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :