एक्स्प्लोर

Lallat : तमाशाच्या फडातील मुलीच्या प्रेमाची व्यथा मांडणारा 'लल्लाट' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Lallat: ‘स्टोरी ऑफ लागीरं’ चित्रपटाच्या यशानंतर आता लगेच रोहित राव नरसिंगे (Roheet Rao Narsinge) यांनी त्यांचा दुसरा चित्रपट 'लल्लाट'ची घोषणा केली आहे.

Lallat Marathi Movie: नुकताच रोहित राव नरसिंगे लिखित आणि दिग्दर्शित ‘स्टोरी ऑफ लागीरं’ हा चित्रपट (Marathi Movie) मराठी टेलिव्हिजनवर प्रदर्शित झाला. या चित्रपटास महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गाने भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाच्या यशानंतर आता लगेच रोहित राव नरसिंगे (Roheet Rao Narsinge) यांनी त्यांचा दुसरा चित्रपट 'लल्लाट'ची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्गासाठी हटके नावाचा ‘लल्लाट’ (Lallat) हा चित्रपट सध्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रामधील सर्व प्रेक्षकांमध्ये हा चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढलेली दिसत आहे.

‘लल्लाट’ (Lallat Marathi Movie) हा चित्रपट मॅक फिल्म्स प्रोडक्शन आणि एम आर जोकर एन्टरटेन्मेंट या चित्रपट निर्मिती संस्थे अंतर्गत होणार आहे, अशी माहिती सध्या सोशल मीडियावर मिळत आहे. या चित्रपटाचे निर्माते महादेव अशोक चाकणकर असून ‘लल्लाट’ हा चित्रपट त्यांची निर्मिती असलेला पहिलाच चित्रपट आहे.

पाहा पोस्टर :


Lallat : तमाशाच्या फडातील मुलीच्या प्रेमाची व्यथा मांडणारा 'लल्लाट' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

लेखक-दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांच्या संकल्पनेमधील ‘स्टोरी ऑफ लागीर’ या चित्रपटास प्रेक्षक वर्ग आणि रसिक वर्गाने भरभरून प्रेम दिले. त्यामुळे आगामी चित्रपट ‘लल्लाट’ यात नेमकं काय बघायला मिळणार? याबाबत सगळ्यांनाच कुतुहल आहे. नुकतीच ‘लल्लाट’ या नव्याकोऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

काय आहे कथानक?

‘लल्लाट’ (Lallat) असं या चित्रपटाचं अतिशय अनोखं शीर्षक आहे. ‘लल्लाट’ या शीर्षकाचा संबंध येथे नशिबाशी आणि त्यात एका तमाशामध्ये लावणी नृत्य करणाऱ्या मुलीच्या नशिबाशी केलेला आहे. आपलं एका श्रीमंत मुलाशी असलेलं प्रेम बाजूला ठेवून, त्याच्या आयुष्यात प्रेम कसं भरता येईल याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीची, तसेच समाजाच्या विरुद्ध जाऊन एका तमासगीर मुलीला समाजात मान मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आपल्या प्रेमाची आहुती देणाऱ्या तमासगीर मुलीचा रोमहर्षक प्रेमप्रवास 'लल्लाट' मध्ये पाहायला मिळणारं आहे.

पुढच्यावर्षी चित्रपट होणार रिलीज!

मॅक फिल्मस प्रोडक्शन, एएस डी डिझाइन आणि एम आर जोकर एन्टरटेन्मेंट निर्मिती अंतर्गत बनत असलेला 'लल्लाट' या चित्रपटाच लेखन आणि दिग्दर्शन रोहित राव नरसिंगे स्वतः करणार आहेत. महादेव अशोक चाकणकर,अनिल मदनसुरी आणि रोहित राव नरसिंगे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ’लल्लाट’ हा चित्रपट एप्रिल  2023ला चित्रपट रसिक दरबारी म्हणजेच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 18 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Embed widget