Priyanka Singh Raghuvanshi : बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत 'पानीकम'; तृतीयपंथीयाच्या आरस्पानी सौंदर्याची होतेय चर्चा
Priyanka Singh Raghuvanshi : उत्तर प्रदेशातील तृतीयपंथी (पारलिंगी) समाजातील प्रियंका सिंह रघुवंशी सौंदर्याच्या बाबतीत अनेक बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत आहे.
![Priyanka Singh Raghuvanshi : बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत 'पानीकम'; तृतीयपंथीयाच्या आरस्पानी सौंदर्याची होतेय चर्चा Priyanka Singh Raghuvanshi Uttar Pradesh lucknow beautiful transgender in UP Trans woman model Third Gender In India lgbt community Bollywood Hollywood Entertainment Latest Update Marathi News Priyanka Singh Raghuvanshi : बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत 'पानीकम'; तृतीयपंथीयाच्या आरस्पानी सौंदर्याची होतेय चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/19/be61696e95fa12ba79ee0147bb805efc1708347691469254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Priyanka Singh Raghuvanshi : जगभरात प्रत्येक सेंकदाला एका बाळाचा जन्म होतो. यात मुलगा-मुलगी असण्यासोबत काही तृतीयपंथीदेखील असतात. तृतीयपंथींचा एका मोठा समाज असला तरी त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहणारादेखील एक वर्ग आहे. पण उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) तृतीयपंथी (पारलिंगी) समाजातील प्रियंका सिंह रघुवंशी (Priyanka Singh Raghuvanshi) सौंदर्याच्या बाबतीत अनेक बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत आहे.
प्रियंका सिंह रघुवंशी ही उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये राहणारी आहे. सौंदर्याच्या बाबतीत प्रियंकाने मात्र फक्त बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूड अभिनेत्रींनादेखील मागे टाकलं आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती कोणत्याही मॉडेलपेक्षा कमी नाही.
View this post on Instagram
कोण आहे प्रियंका सिंह रघुवंशी? (Who is Priyanka Singh Raghuvanshi)
तृतीयपंथी असलेल्या प्रियंकाची नॅचरल ब्यूटी आहे. उत्तरप्रदेशातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या तृतीयपंथीयांमध्ये प्रियंकाचा समावेश होतो. प्रियंका सोशल मीडियावरदेखील चांगलीच अॅक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर तिचे 103 हजार फॉलोअर्स आहेत. आतापर्यंत तिने 1,647 पोस्ट केल्या आहेत. तसेच तिने आपल्या इंस्टा बायोमध्ये ती व्यावसायिक मॉडेल, अभिनेत्री आणि समाजसेविका असल्याचं लिहिलं आहे. उत्तर प्रदेश ट्रान्सजेंडर फाऊंडेशनची ती अध्यक्षा आहे.
कोरोनाकाळात प्रियंका सिंह रघुवंशी चांगलीच अॅक्टिव्ह होती. यादरम्यान तिने उत्तर प्रदेशातील शिव फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक चांगली कामे केली. कोरोनाची लागन झालेल्या रुग्णांना ऑक्सिझन सिलेंडर मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा होता.
View this post on Instagram
गरीबांना मदत करायला प्रियंका सिंह रघुवंशीला आवडतं. गरीब रुग्णांच्या मदतीसाठी तिने खास रुग्णवाहिका विकत घेतली आहे. पब्लिसिटी मिळवण्यासाठी नव्हे तर समाजसेवा करण्यासाठी प्रियंका वेगवेगळी कामे करत असते. आपल्या आगामी कार्यक्रमांची माहिती प्रियंका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. प्रियंकाचा मोठा चाहतावर्ग आहे. तिची प्रत्येक पोस्ट काहीतरी माहिती देणारी आहे. राजकारणापेक्षा समाजसेवा करायला प्रियंकाला आवडतं. तिचं युट्यूब चॅनलदेखील आहे. शूटिंगची आवड असल्याचं तिने आपल्या बायोमध्ये लिहिलं आहे.
संबंधित बातम्या
Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' पाहायला सिनेमागृहात शिवप्रेमींसह सिनेप्रेक्षकांची तुफान गर्दी; रिलीजच्या तीन दिवसांतच जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)