एक्स्प्लोर
Advertisement
प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं!
लग्न मोडल्याचा अनुभव प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राला दुसऱ्यांदा आला. ऑक्टोबर 2014 मध्ये गर्लफ्रेण्ड कनिका माथुरसोबत झालेला सिद्धार्थचा साखरपुडा मोडला होता
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या कुटुंबात एक कटू घटना घडली आहे. प्रियांकाचा धाकटा भाऊ सिद्धार्थचं लग्न मोडल्याची वाईट बातमी आहे. प्रियांका चोप्राच्या आई मधू चोप्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांचा गेल्या आठवड्यात विवाह होणार होता. 'सिद्धार्थने लग्नासाठी आपली मानसिक तयारी नसल्याचं सांगितलं. त्याला आणखी काही वेळ हवा आहे' असं मधू चोप्रांनी सांगितलं.
इशिताने गुरुवारी इन्स्टाग्राम पोस्टमधून लग्न मोडल्याचे संकेत दिले होते. 'नव्या शुभारंभाला चिअर्स, सुंदर शेवटाला गुडबाय किस' असं कॅप्शन इशिताने बारमध्ये काढलेल्या एका फोटोला दिलं होतं. इशिता आणि सिद्धार्थचं लग्न हे अरेंज मॅरेज होतं.
फेब्रुवारी महिन्यातच प्रियांका चोप्रा सिद्धार्थ आणि इशिताच्या रोका समारंभाला उपस्थित राहिली होती. त्यावेळी प्रियांकाने इशिताचं चोप्रा कुटुंबात स्वागत केलं होतं. विशेष म्हणजे लग्न मोडल्याचा अनुभव सिद्धार्थला दुसऱ्यांदा आला आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये गर्लफ्रेण्ड कनिका माथुरसोबत सिद्धार्थचा साखरपुडा झाला होता. मात्र फेब्रुवारी 2015 मध्ये गोव्यात नियोजित असलेला विवाहसोहळा फिस्कटला, असं मुंबई मिररच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.View this post on InstagramCheers to new beginnings🥂 With a goodbye kiss to beautiful endings 🌺
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement