Priyanka Chopra:'मला जे लोक आवडत नाहीत, त्यांच्यासोबत मी काम करु शकत नाही...' प्रियांकाच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
रिचर्ड मॅडनसोबत प्रियांकाने (Priyanka Chopra) सोमवारी (3 एप्रिल) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेतही हजेरी लावली. यावेळी प्रियांकाने विविध विषयांवर चर्चा केली.
Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही सध्या तिच्या 'सिटाडेल' (Citadel) या आगामी सीरिजचे प्रमोशन करत आहे. या सीरिजमधील कलाकार रिचर्ड मॅडनसोबत प्रियांकाने सोमवारी (3 एप्रिल) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेतही हजेरी लावली. यादरम्यान प्रियांकाने सांगितले की, जे व्यक्ती तिला आवडत नाहीत त्यांच्यासोबत ती काम करू शकत नाही.
प्रियांकाने हे देखील की तिचे प्रोजोक्ट निवडण्याचे निकष गेल्या काही वर्षांत बदलले आहेत. प्रियांका म्हणाली, "मला आवडत नसलेल्या लोकांसोबत मी काम करू शकत नाही. हे नॉन-निगोशिएबल आहे. मला माझ्या आजूबाजूच्या लोकांचे कौतुक करावे लागते. मी हे बऱ्याच काळापासून करत आहे. मी मझ्या कामाबद्दल एक्सायटेड असते.'
इव्हेंटमध्ये प्रियांकाने 'सिटाडेल'च्या इंडियन व्हर्जनबद्दल देखील सांगितले. सिटाडेल'च्या इंडियन व्हर्जनमध्ये वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. वरुण आणि समंथा यांना काही सल्ला द्यायचा आहे? असा प्रश्न कार्यक्रामाध्ये प्रियांकाला विचारण्यात आला. या प्रश्नाला प्रियांकानं उत्तर दिलं, मला वाटत नाही की मी त्यांना काही सल्ला देऊ शकेन कारण ते दोघेही चांगले कलाकार आहेत. मी नुकतीच वरुणला भेटले आणि तो मला शूटिंग कसं चाललंय ते सांगत होता.'
'सिटाडेल' ही सीरिज जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे. 'सिटाडेल' या वेब सीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. ही सीरिज भारतातील लोक हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पाहू शकणार आहेत. प्रियांकाच्या या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी प्रियांका आणि तिचा पती निक जोनास यांनी 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या भव्य उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली.दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रियांकानं तिच्या ग्लॅमरस लूकने अनेकांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्रियांकानं विंटेज ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस 65 वर्षांपूर्वीच्या साडीपासून तयार करण्यात आला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :