एक्स्प्लोर
प्रियंका चोप्राला ओबामांचं डिनरसाठी आमंत्रण?
न्यूयॉर्क : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा भारताचा झेंडा अटकेपार रोवताना दिसत आहे. 'क्वॉन्टिको' सारखी परदेशी मालिका, ऑस्करच्या मंचावर हजेरी आणि 'बेवॉच'मधील हॉलिवूड डेब्यू ही उदाहरणं ताजी असतानाच प्रियंकाला थेट ओबामांनी भेटीचं आमंत्रण दिल्याचं वृत्त आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊस डिनरला प्रियंका हजेरी लावण्याची शक्यता आहे. ओबामा कुटुंबीयांनी यजमानपद भूषवलेल्या डिनरला ब्रॅडली कूपर, जेन फोंडा, ल्युसी लियू यासारख्या हॉलिवूड कलाकारांसोबत सहभागी होण्याची संधी पीसीला मिळू शकते.
ओबामांचं हे अखेरचं व्हाईट हाऊस डिनर असेल. द व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स असोसिएशन डिनरला राष्ट्राध्यक्ष, फर्स्ट लेडी म्हणजेच त्यांच्या पत्नी आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी यांसारखी मंडळी उपस्थित राहतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement