एक्स्प्लोर
'टाइम'च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये प्रियंका चोप्रा
न्यूयॉर्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने भारताची मान जगभरात पुन्हा एकदा उंचावली आहे. टाइम मासिकाच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये प्रियंका चोप्राचं नाव झळकलं आहे. टाइमच्या सहा पैकी एका कव्हरपेजवरही तिचा फोटो दिसत आहे.
प्रियंकासोबत ऑस्कर विजेता अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ, फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांचाही समावेश आहे. प्रियंकाशिवाय टेनिसस्टार सानिया मिर्झा, गुगलचे सुंदर पिचाई, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन या भारतीयांचाही समावेश आहे.
अमेरिकन टीव्ही मालिका क्वॉन्टिकोमध्ये प्रियंकाने मुख्य भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे बेवॉच या हॉलिवूडपटातही ती झळकणार आहे. ऑस्करच्या मंचावरही तिची पुरस्कार प्रदान करण्यासाठी वर्णी लागली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement