एक्स्प्लोर
प्रियांका आणि निक अवघ्या चार महिन्यांतच संसार मोडणार?
मागील वर्षी डिसेंबरमध्ये निक आणि प्रियांकाच्या शाही विवाहसोहळा पार पडला होता. जोधपूरमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्यात कुटुंबातील निवडक आणि खास लोकच सहभागी झाले होते.
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच आपला संसार मोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. एका इंग्लिश वेबसाईटच्या वृत्तानुसार, प्रियांका आणि निकने घाईगडबडीत लग्न केलं आणि आता त्यांच्यात वाद होऊ लागले आहेत. त्यामुळे या दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत, असं वृत्त आहे.
"निक जोनास आणि प्रियांकाने एकमेकांना फार वेळ न देता, जाणून न घेता गडबडीत लग्न केलं आणि हे दोघे प्रत्येक गोष्टीवर भांडत असतात. प्रियांका आणि निक कामापासून पार्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीवरुन भांडतात. दोघांनी घाईत मोठा निर्णय घेतला आणि आता त्याचीच किंमत मोजत आहेत. त्यांचं लग्न धोक्यात आहे," असं OK या वेबसाईटच्या वृत्तात म्हटलं आहे.
या वेबसाईटच्या वृत्तानुसार, "प्रियांका अतिशय कूल असल्याचं निकला आधी वाटत होतं. पण लग्नानंतर निकला प्रियांकाचा कंट्रोल करणारा स्वभाव लक्षात आला. प्रियांकाला रागही लवकर येतो आणि लग्नाच्या सेलिब्रेशनपर्यंत निकला याबाबत माहिती नव्हती."
दरम्यान, एबीपी न्यूजने प्रियांका चोप्राच्या टीमसोबत संपर्क करुन याबाबत विचारणा केली. घटस्फोटाचं वृत्त पूर्णत: चुकीचं आणि खोटं असल्याचं तिच्या टीमने सांगितलं. मात्र प्रियांकाकडून अधिकृत वक्तव्य केव्हा जारी होणार हे अद्याप सांगितलेलं नाही.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये निक आणि प्रियांकाच्या शाही विवाहसोहळा पार पडला होता. जोधपूरमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्यात कुटुंबातील निवडक आणि खास लोकच सहभागी झाले होते.
दुसरीकडे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्र सध्या पती निक जोनाससोबत मियामीमध्ये सुट्टीसाठी गेली आहे. त्यांच्यासोबत जो जोनास आणि त्याची गर्लफ्रेण्ड सोफी टर्नरही आहेत. आपल्या धम्माल मस्तीचे व्हिडीओ आणि फोटो या चौघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement