Priya Bapat Umesh Kamat Love Story : प्रिया बापट आणि उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी; बारावीत असताना 'चॉकलेट बॉय'च्या पडलेली प्रेमात
Priya Bapat Umesh Kamat : प्रिया बापट आणि उमेश कामत यांची लव्हस्टोरी खूपच खास आहे.
Priya Bapat Umesh Kamat Love Story : मराठी मनोरंजनसृष्टीतील क्यूट जोडी अर्थात प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामतची (Umesh Kamat) लव्हस्टोरी खूपच खास आहे. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.
प्रिया बापट आणि उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी...
'दोन स्पेशल' या कार्यक्रमादरम्यान प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य केलं होतं. 'चॉकलेट बॉय' म्हणून लोकप्रिय असलेला उमेश त्यावेळी छोटा पडदा गाजवत होता. प्रिया त्यावेळीच त्याच्या प्रेमात पडली होती. प्रिया आणि उमेश यांच्या वयात आठ वर्षांचं अंतर आहे. ती शाळेत असल्यापासूनच उमेशची मोठी चाहती होती. पुढे बारावीत असताना ती उमेश कामतच्या प्रेमात पडली.
View this post on Instagram
उमेश कामत हा वेळ घेऊन निर्णय घेणाऱ्यांपैकी आहे. प्रियाप्रमाणे उमेशही तिच्या प्रेमात पडला होता. याबद्दल बोलताना प्रिया म्हणाली होती की,"मी उमेशच्या प्रेमात पडले तेव्हा माझं वय फक्त 18 वर्ष होतं. त्यावेळी आमचं नातं नक्की कोणत्या दिशेला जात आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती". प्रिया आणि उमेशच्या नात्याला घरातूनही थोडा विरोध झाला होता.
प्रियाने उमेशला कसं प्रपोज केलं? (Priya Bapat Propose Umesh Kamat)
प्रिया बापटने उमेश कामतला प्रपोज केलं आहे. प्रिया आणि उमेश एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 8 ऑगस्टला प्रिया बापटने उमेश कामतला प्रपोज केलं. पण त्यावेळी उमेशने प्रियाने काहीही उत्तर दिलं नव्हतं. 18 सप्टेंबरला उमेशच्या वाढदिवशी उमेशने तिला होकार दिला होता. पुढे 2011 साली ते लग्नबंधनात अडकले.
प्रिया बापट आणि उमेश कामतचा मोठा चााहतावर्ग आहे. मनोरंजनसृष्टीतील मंडळींसह त्यांच्या चाहत्यांचेदेखील ते फेव्हरेट आहेत. प्रियाने उमेशचा नंबर 'बंड्या' या नावाने सेव्ह केला होता. अनेक प्रोजेक्टमध्ये प्रिया आणि उमेश एकत्र झळकले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 'आणि काय हवं' ही त्यांची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
संबंधित बातम्या