Priya Bapat : ...म्हणून मी बिकिनी घालते, उमेश कामतसमोर बिनधास्त प्रिया बापटची बोल्ड उत्तरं
Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटने बिकिनीतील फोटो शेअर केल्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता या प्रकरणावर अभिनेत्रीने अखेर आपलं मत मांडलं आहे.

Priya Bapat : मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी हे चाहत्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य वाटत असतात. या सेलिब्रिटींची एखादी कृती चाहत्यांना खटकते आणि त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येतं. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ऑस्ट्रेलियाला फिरायला गेली होती. त्यावेळी तिने बिकिनीतील फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर केल्यानंतर काही चाहत्यांनी अभिनेत्रीच्या धाडसाचं कौतुक केलं. तर दुसरीकडे मात्र काहींनी तिला चांगलं ट्रोल केलं. पण त्यावेळी या चाहत्यांना अभिनेत्रीने काहीही उत्तर दिलं नाही. आता नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने याप्रकरणावर तिचं मत मांडलं आहे.
सोयीस्कररित्या मराठी संस्कृतीचे झेंडे घेऊन फिरणं प्रियाला आवडत नाही...
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बापट म्हणाली,"ऑस्ट्रेलियामधील बिकिनीतील फोटो शेअर केल्यानंतर मी प्रचंड ट्रोल झाले. पण त्यावेळी मी शांत राहणं पसंत केलं. दुसरीकडे माझ्याच काही चाहत्यांनी माझी बाजू घेतली. मला असं वाटतं, आपण खूप सोयीस्कररित्या मराठी संस्कृतीचे झेंडे घेऊन फिरतो. मला ही गोष्ट आवडत नाही. मी कोणते कपडे घालावेत यावरुन आपली संस्कृती नाही ठरत".
प्रिया बापट म्हणाली,"माझं वागणं, माझे आचार-विचार, माझ्या घरच्यांची शिकवण, मी चार लोकांसोबत कशी बोलते, त्यांच्यासोबत कशी वागते, मी माझं काम प्रामाणिकपणे करते की नाही यावर माझा सुसंस्कृतपणा ठरतो. माझ्या कपड्यांवर ठरत नाही. ज्यांना मी साडी नेसली म्हणजे चांगली आणि बिकनी घातली म्हणजे वाईट असं ज्यांना कोणाला वाटत असेल तर मला त्यांना उत्तरंचं द्यावसं वाटत नाही. मुळातच कोणत्याही व्यक्तीसाठी ती व्यक्ती चांगली आहे की वाईट आहे, ती सुसंस्कृत आहे की असंस्कृत आहे हे ठरवण्यासाठी कपडे हे अत्यंत चुकीचा क्रायटेरिया आहे. माझ्याकडे काम नाही म्हणून मी असे फोटो शेअर केले असंही बऱ्याच जणांनी म्हटलं आहे. बिकीनीतील फोटो शेअर केल्यानंतर मला काम मिळेल असं त्यांचं मत होतं. पण खरंतर बिकीनी घातली म्हणजे काम मिळेल असं या इंडस्ट्रीत होत नाही".
मी माझ्या आवडीसाठी बिकीनी घातली : प्रिया बापट
प्रिया पुढे म्हणाली,"मी माझ्या आवडीसाठी बिकीनी घातली होती. आपल्या प्रत्येकाचे बेंचमार्क असतात. आज मला माझ्या शरीराबद्दल आत्मविश्वास आहे. मी जशी आहे तशी वावरू शकते. प्रत्येकाचा एक बॉडी टाईप असतो. मी स्वत:ला आवडते हे कळायला मला थोडा वेळ लागला. मी स्वत:ला बिकिनीमध्ये आवडले म्हणून मी ते फोटो शेअर केले. बाकी कोणाला ते आवडावे हा मुद्दाच नव्हता. चाहत्यांना तुम्ही घरातले वाटतात. त्यामुळे ते हक्काने कमेंट्स करत असतात. पण मला किंवा माझ्या घरच्यांना मी केलेली गोष्ट चूक आहे असं वाटत नाही तोपर्यंत मी या गोष्टीचा फार विचार करत नाही. पण प्रत्येक कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या आवडीनिवडी असू शकतात हे लोकांनी मान्य करायला हवं".
निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या लोकांचा तो स्वभाव असतो : उमेश कामत
उमेश कामत (Umesh Kamat) म्हणाला,"निगेटिव्ह गोष्टीकडे आपलं आधी लक्ष जातं. निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या लोकांचा तो स्वभाव असतो. त्यामुळे कोणत्याही चांगल्या गोष्टीत त्यांना वाईट दिसतं. पण दुसरीकडे अनेक लोक सकारात्मक कमेंट करत असतात.
संबंधित बातम्या
Priya Bapat: "प्लास्टिकचे कंदील बघून वीट आला...."; प्रिया बापटच्या पोस्टनं वेधलं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
