Prajakta Mali: 'मनसे' पक्षाच्या नव्या गाण्यावर प्राजक्ताचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, 'एक नंबर...'
सध्या प्राजक्ताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता ही मनसे (Maharashtra Navnirman Sena) पक्षाच्या नव्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. प्राजक्ता ही विविध मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येते. सध्या प्राजक्ताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता ही मनसे (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाच्या नव्या पक्षगीतावर डान्स करताना दिसत आहे.
राज ठाकरे फॅन क्लब या नावाच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर प्राजक्ताचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता ही मनसे या पक्षाच्या पक्षगीतावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला 'करू तयारी रे, घेऊ भरारी रे... राजमुद्रा ही मिरवूया' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. प्राजक्ताच्या डान्सच्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
प्राजक्ताच्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'खूप छान प्राजक्ता' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'एक नंबर'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
मनसे पक्षाच्या या गीताचे गीतकार मंदार चोळकर हे आहेत. तर हे गाणं नवोदित गुणीनं संगीतबद्ध केले आहे. गाण्याचा संगीतकार हितेश मोडक हा असून हे गाणं प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यानं गायलं आहे.
प्राजक्ता माळीच्या 'प्राजक्तराज' या ज्वेलरी ब्रँडच्या उद्घाटन सोहळ्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील उपस्थित होत्या.
मालिका आणि चित्रपटांमध्ये प्राजक्तानं केलं काम
प्राजक्ताचे चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट बघत असतात. काही दिवसांपूर्वी तिची रानबाझार ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सीरिजमध्ये प्राजक्तानं रत्ना ही भूमिका साकारली आहे. रानबाझार या सीरिजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं अनेक लोकांनी कौतुक केलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. या कार्यक्रमाचं ती सूत्रसंचालन करते. तसेच तिचा लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्राजक्ताबरोबरच या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Prajakta Mali : '...म्हणून हा घाट'; मनसे गुढीपाडवा मेळाव्यानंतर प्राजक्ता माळीची खास पोस्ट