The RajaSaab : प्रभास बनला 'द राजासाब', आगामी चित्रपटाचा टीझर समोर; रिलीज डेटची घोषणा
Prabhas The RajaSaab Trailer Out : प्रभासच्या 'द राजासाब' चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. या चित्रपटाची टक्कर KGF स्टार यशच्या 'टॉक्सिक' या आगामी चित्रपटाशी होणार आहे.
मुंबई : साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) पुन्हा एकदा मोठा पडदा गाजण्यासाठी सज्ज झाला आहेत. कल्की 2898 एडी (Kalki 2898 AD) चित्रपटाच्या भरघोस यशानंतर प्रभास आता त्याचा बहुप्रतिक्षित राजा साहेब हा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभासच्या (Actor Prabhas) आगामी 'द राजासाब' (The RajaSaab Movie) चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. मारुती दिग्दर्शित या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चर्चा होता. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यासोबतच चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
प्रभासच्या 'द राजासाब' चित्रपटाचा टीझर समोर
प्रभासच्या कल्की 2898 AD या चित्रपटाची जादू महिनाभरानंतरही कमी झालेली नाही. नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने भारतातच नाही तर जगभरात मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींहून अधिक रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. कल्कि चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर प्रभासच्या पुढील चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. प्रभासचा 'द राजासाब' चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हॉरर रोमँटिक कॉमेडी चित्रपटाची पहिली झलक
'द राजासाब' चित्रपटाच्या टिझरमध्ये प्रभास बुलेटवरून येताना दिसत आहे. त्याच्या हातात फुलांचा गुच्छ आहे. कोट आणि पँट घातलेला प्रभास बाईकवरून खाली उतरतो आणि शेजारी उभ्या असलेल्या कारच्या आरशात आपला चेहरा पाहतो. यानंतर, तो फुलाची पानं तोडतो आणि त्याने स्वतःची दृष्टी काढतो, असं दाखवण्यात आलं आहे.
'द राजासाब' चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा
View this post on Instagram
मारुती यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या 'द राजासाब' चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी झाली होती. याआधी चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं होतं, ज्यामध्ये प्रभासचा जबरदस्त लूक पाहायला मिळाला होता. निर्मात्यांनी 29 जुलै रोजी 'द राजासाब' चित्रपटाचा टीझर रिलीज केला.
View this post on Instagram
'सालार' आणि 'कल्की' हे लागोपाठ दोन हिट चित्रपट दिल्यानंतर प्रभासकडून चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे. प्रभासचा आगामी चित्रपट 'द राजासाब' हॉरर रोमँटिक कॉमेडी असणार आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. साऊथ रॉकिंगस्टार अभिनेता यश याचा 'टॉक्सिक' चित्रपटही याचं दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर प्रभासचा 'द राजासाब' आणि यशचा 'टॉक्सिक' या चित्रपटाची टक्कर पाहायला मिळणार आहे.