Poonam Pandey : पूनम पांडेला मोदी सरकारकडून 'गिफ्ट' मिळणार? आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त
Poonam Pandey : काही दिवसांपूर्वी पूनमने आपला कर्करोगाने मृत्यू झाल्याची आवई उठवली होती. त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले होते.
Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हीला काही दिवसांपूर्वी केलेला स्टंट फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार (Central Government) पूनमला सर्वाइकल कर्करोग (Cervical Cancer) जनजागृतीच्या मोहिमेसाठी ब्रॅण्ड ॲम्बेसेडर बनवू शकते. काही दिवसांपूर्वी पूनमने आपला कर्करोगाने मृत्यू झाल्याची आवई उठवली होती. त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले होते.
'पीटीआय'या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पूनम पांडे आणि तिची टीम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करत आहे. पूनम पांडे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत सरकारच्या सुरू असलेल्या जनजागृती कार्यक्रमाची ब्रँड ॲम्बेसेडर बनू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला पूनम पांडेच्या पीआर टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून अभिनेत्रीच्या मृत्यूची खोटी बातमी पोस्ट केली होती. अभिनेत्रीचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले. अभिनेत्रीच्या आजारपणामुळे अचानक मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण दुसऱ्याच दिवशी ही बातमी खोटी असल्याचे उघड झाले आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी पूनमने हा स्टंट केला असल्याचे तिने सांगितले.
अचानक जिवंत झाली पूनम...
3 फेब्रुवारी रोजी पूनम पांडेने एक व्हिडिओ पोस्ट करून ती जिवंत असल्याची माहिती दिली होती. ती म्हणाली- 'मला असे करण्यास भाग पडले. मी तुमच्या सर्वांसोबत काही महत्वाच्या गोष्टी शेअर करत आहे, मी इथे आहे, जिवंत असल्याचे तिने म्हटले. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने माझा जीव घेतला नाही, परंतु या आजाराचा सामना कसा करावा याबद्दल माहिती नसल्यामुळे हजारो महिलांचे प्राण घेतले असल्याकडे पूनमने आपल्या इन्स्टा व्हिडीओमध्ये म्हटले.
View this post on Instagram
कोण आहे पूनम पांडे (Who is Poonam Pandey)
पूनम पांडे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरदेखील चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आपल्या हॉट अंदाजाने ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. 2013 मध्ये 'नशा' या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. अनेक सिनेमांत आणि छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांत तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.
इतर संबंधित बातमी :