एक्स्प्लोर

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, बॉलिवूडकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

Bollywood Celebs Wished To PM Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आपला 72वा वाढदिवस साजरा करत आहेत

Bollywood Celebs Wished To PM Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (17 सप्टेंबर) आपला 72वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी जगभरातून शुभेच्छांचा ओघ सुरु आहे. तर, बॉलिवूड कलाकारांनी देखील नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेते परेश रावल ते अभिनेत्री कंगना रनौत या कलाकारांच्या यादीत सामील आहेत.

वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. अभिनेते परेश रावल (Paresha Rawal) यांनी ट्विट करत नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, 'तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.'

अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना लिहिले की, ‘आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी! तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! परमेश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो! घेतलेली शपथ आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात! वर्षानुवर्षे करत राहाल! तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद! वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!’

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने देखील ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 'तुमची दृष्टी, तुमची कळकळ आणि तुमची काम करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी मला खूप प्रेरणा देतात. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारी वर्ष तुमच्यासाठी आरोग्यदायी आणि आनंदी जावो हीच सदिच्छा.’

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप नेत्या किरण खेर (Kirron Kher) यांनीही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भारताला नवीन उंचीवर नेण्यासाठी मोठी उर्जा देवो. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे सर. जय हिंद.'

‘लय भारी’ अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने देखील पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. अभिनेता रितेश देशमुखने लिहिले की, 'आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.’

‘पंगा’ क्वीन बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनेही (Kangana Ranaut) आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहित पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे’, असे तिने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले आहे.

‘सिंघम’ अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजयने लिहिले की, 'माननीय नरेंद्र मोदीजी, तुमचे नेतृत्व मला प्रेरणा देते. येत्या वर्षांत तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना!’

हेही वाचा :

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 72 वा वाढदिवस, राहुल गांधींसह विविध राजकीय नेत्यांनी दिल्या शुभेच्छा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget