PK Rosy : पी.के रोझी यांच्या जयंतीनिमित्त गूगलचं खास डूडल; मल्याळम सिनेसृष्टीतील पहिल्या महिला अभिनेत्रीच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या...
Pk Rosy Birth Anniversary : अभिनेत्री पी. के रोझी यांच्या 120 जन्मदिनानिमित्त गूगलने खास डूडलच्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिली आहे.
PK Rosy Birth Anniversary : मल्याळम अभिनेत्री पी.के रोझी (PK Rosy) यांची आज 120 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्च इंजिन गूगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवलं आहे. या खास डूडलच्या माध्यमातून गूगलने पी.के रोझी यांना मानवंदना दिली आहे. पी.के रोझी यांचा जन्म 1903 मध्ये तिरुअनंतपुरम येथे झाला. त्यावेळी तिरुअनंतपुरम त्रिवेंद्रम म्हणून ओळखलं जात असे. पी.के रोझी यांना बालपणीच अभियनयाची गोडी लागली होती.
पी.के रोझी यांनी 1928 साली 'विगाथाकुमारन' (Vigathakumaran) या मल्याळम सिनेमाच्या (Malayalam cinema) माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात त्या मुख्य भूमिकेत होत्या. त्यावेळी लोकांचा अभिनयक्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता. पण तरीही पी.के रोझी यांनी अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या पहिल्या महिला अभिनेत्री होत्या. त्यावेळी महिलांना अभिनय करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा त्यांचं घर जाळण्यात आलं होतं.
Today's #GoogleDoodle honors the birthday of P.K. Rosy, the first female lead to be featured in Malayalam cinema.
— Google Doodles (@GoogleDoodles) February 9, 2023
Learn more about her life —> https://t.co/ONuLrtfseV pic.twitter.com/y2JZSYmeDs
पी.के रोझी यांच्या आयुष्यात नवा ट्विस्ट
घराला आग लागल्यानंतर पी.के रोझी स्वत:चा बचाव करत थेट तामिळनाडूमध्ये पोहोचल्या. त्यादरम्यान पीके रोझी यांच्या आयुष्यात नवा ट्विस्ट आला. त्यांनी लॉरी ड्रायव्हर केशवन पिल्लईसोबत लग्न केलं. पी.के रोझी या त्याकाळी लोकप्रिय अभिनेत्री असल्या तरी त्यांचा एकही फोटो गूगलकडे नाही. पी.के रोझी यांना सिनेमांची, अभिनयाची आवड असली तरी अभिनेत्री म्हणून समाजाने त्यांना कधीही स्वीकारलं नाही. पण तरीही मल्याळम सिनेसृष्टीतील पहिल्या महिला म्हणून पी.के रोझी यांची ओळख आहे.
पी.के रोझी यांनी महिलांना अभिनय क्षेत्रात काम करता यावं यासाठी आवाज उठवला आहे. महिलांना परफॉर्मिंग आर्टमध्ये काम करण्यासाठी संधी मिळवून दिली आहे. पी.के रोझी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पोटापाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. पण तरीही त्यांनी अभिनयासह शास्त्रीय नृत्य आणि गाण्याचं शिक्षण घेतलं आहे.
गूगलचं खास डूडल
पी.के रोझी यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डूडल बनवलं आहे. गूगलच्या या डूडलद्वारे पी.के रोझी यांना मानवंदना देण्यात आली आहे. गूगलने हे डूडल शेअर करत लिहिलं आहे,"आजचं गूगल डूडल पी.के रोझी यांच्या वाढदिवसानिमित्त खास बनवण्यात आलं आहे. पी.के रोझी या मल्याळम सिनेसृष्टीतील पहिल्या महिल्या अभिनेत्री होत्या".
गूगलने वॉटरकलरच्या माध्यमातून हे डूडल बनवलं आहे. झोया रिसायने (Zoya Riyas) हे डूडल डिझाइन केलं आहे.
संबंधित बातम्या