एक्स्प्लोर
'जय गंगाजल' प्रकरणी प्रकाश झा यांना एक कोटींची नोटीस
मुंबई : गंगाजल, अपहरण सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक प्रकाश झा यांना एक कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली आहे. गंगाजल या चित्रपटाच्या सिक्वेलचे अधिकार नसतानाही जय गंगाजल चित्रपट केल्याबद्दल फँटम फिल्म्सने ही नोटीस बजावली आहे.
विकास बहल, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, मधु मंटेना यांनी एकत्रितपणे फँटम फिल्म्स हे प्रॉडक्शन हाऊस सुरु केलं आहे. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या गंगाजल या कलाकृतीचा मालकी हक्क आपल्याकडे असल्याचा दावा चित्रपटसंस्थेने केला आहे. त्यामुळे याचा सिक्वेल किंवा त्यावर आधारित कोणतीही कलाकृती काढण्याचा अधिकार आपल्याकडे राखीव असल्याचं फँटम फिल्म्सने म्हटलं आहे.
प्रकाश झा प्रॉडक्शन्सने कुठलीही परवानगी न घेता सिक्वेल केल्याचं फँटम फिल्म्सने 6 ऑगस्ट रोजी बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. चित्रपटाची निर्मिती आधीच झाल्यामुळे आणि बौद्धिक मालकी हक्काचं उल्लंघन झाल्यामुळे नुकसानभरपाई म्हणून एक कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी नोटिशीत केली गेली आहे.
सात दिवसात ही रक्कम न दिल्यास दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याविरोधात आपण कोर्टात जाऊ, असंही म्हटलं आहे. जय गंगाजलचे सहनिर्माते असलेल्या प्ले एंटरटेनमेंटने ट्रेड मासिकात गंगाजलच्या अधिकारांबद्दल जाहिरात दिल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement