(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pathaan Box Office : शाहरुखच्या 'पठाण'ची हवा; कोरोनात बंद पडलेले 25 सिंगल स्क्रिन थिएटर्स पुन्हा सुरू होणार!
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'पठाण'ची लोकप्रियता लक्षात घेत बंद पडलेले सिंगल स्क्रिन थिएटर्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतला आहे.
Shah Rukh Khan Pathaan Box Office : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. किंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता शाहरुखची आणि त्याच्या बहुचर्चित सिनेमाची लोकप्रियता लक्षात घेत बंद पडलेले सिंगल स्क्रीन थिएटर्स (Single Screen) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतला आहे.
सिनेमागृहांना सुगीचे दिवस!
सिनेसृष्टीला कोरोनाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे अनेक थिएटर मालकांनी कोरोनानंतर सिंगल स्क्रिन थिएटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे अनेक बिग बजेट सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण आता 'पठाण' सिनेमाने सिनेमागृहांना सुगीचे दिवस दाखवले आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने देशभरातील 25 सिंगल स्क्रिन थिएटर्स पुन्हा सुरू होणार आहेत.
‘PATHAAN’ REVIVES SINGLE SCREENS… #Pathaan is all set to revive theatrical biz, going by the terrific advance bookings… Most importantly, as many as 25 single screens across #India - which were shut - will re-open with #Pathaan this week, given the unprecedented buzz. pic.twitter.com/ICGpywDTzh
— taran adarsh (@taran_adarsh) January 23, 2023
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'पठाण'ची रेकॉर्डब्रेक कमाई!
'पठाण' हा सिनेमा अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. त्यामुळे आता हा सिनेमा थिएटर व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशभरातील बंद झालेले 25 सिंगल स्क्रीन थिएटर आता या आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाने 50 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. या सिनेमात शाहरुख अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. या सिनेमातील गाणी, टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
'पठाण' या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. शाहरुखसह दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची झलकदेखील या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
जगभरातील 2500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार 'पठाण'!
'पठाण' हा सिनेमा उद्या जगभरातील 2500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत 3,91,000 हजार तिकीटांची विक्री झाली आहे. शाहरुखचे चाहते तब्बल अडीच हजारात या सिनेमाचं तिकीट विकत घेत आहेत. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या