एक्स्प्लोर
'आता विश्वात्मके'ला अनोखा टच, 'घुमा'त ऑपेरा स्टाईल पसायदान
विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने शाळांची दुरवस्था आणि शिक्षक करत असलेली धडपडही या गाण्यात दाखवली आहे.
मुंबई : संत ज्ञानेश्वरांनी रचलेलं पसायदान मराठी शाळेत शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला तोंडपाठ असेल. आगामी 'घुमा' चित्रपटात हे पसायदान एका वेगळ्या ढंगात ऐकायला मिळणार आहे. शालेय शिक्षण पद्धतीवर भाष्य करणाऱ्या घुमा चित्रपटात ऑपेरा स्टाईलमध्ये पसायदान सादर होत आहे.
'आता विश्वात्मके देवे'चे सूर घुमल्यावर वातावरणात एकप्रकारची प्रसन्नता येते. 'मास फिल्म्स' प्रस्तुत आणि महेश काळे दिग्दर्शित 'घुमा' चित्रपटात ग्रामीण भागातील इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे ओस पडणाऱ्या मराठी शाळा आणि शालेय शिक्षण पद्धतीवर भाष्य करण्यात आलं आहे.
घुमा चित्रपटातील पसायदानातूनही एका गरीब विद्यार्थ्याचा शाळेत जाण्यापर्यंतचा प्रवास दिसतो. विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने शाळांची दुरवस्था आणि शिक्षक करत असलेली धडपडही या गाण्यात दाखवली आहे.
घुमातील ऑपेरा स्टाईल पसायदान मुग्धा हसबनीसने गायलं आहे. याशिवाय अजय गोगावलेच्या आवाजातील वणवा पेटला, वैशाली जाधववर चित्रित झालेली इंग्लिश शिकवून सोडा ही लावणी गाजत आहेत.
पाहा व्हिडिओ :
शरद जाधव, प्रमोद कसबे, तेश्वानी वेताल, वैशाली जाधव, गणेश लिमकर, यश दौंडकर, छाया दौंडकर यांची भूमिका असलेला घुमा हा चित्रपट 29 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
पाहा 'वणवा पेटला'चा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement