एक्स्प्लोर

Main Atal Hoon : 'हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय'; पंकज त्रिपाठींच्या 'मैं अटल हूं'मधील नवं गाणं आऊट

Main Atal Hoon : पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या 'मैं अटल हूं' या सिनेमातील 'हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय' हे नवं गाणं आऊट झालं आहे.

Main Atal Hoon : बॉलिवूडचा अभ्यासू अभिनेता, ओटीटी विश्व गाजवणारा पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या 'मैं अटल हूं' (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय' हे नवं गाणं आऊट झालं आहे.

'मैं अटल हूं'मधील नवं गाणं आऊट!

पंकज त्रिपाठी यांनी 'हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय' या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या ज्या कवितेवर तुम्ही प्रेम केलं त्या हिंदू तन मनचा सुरेल अंदाज. गाणं आज रिलीज झालं आहे. सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होईल". 

'हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय'  हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. गायक कैलास खेर यांनी आपल्या शानदार आवाजात हे गाणं गायलं आहे. तर अमितराज यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 

'मैं अटल हूं'बद्दल जाणून घ्या...

'मैं अटल हूं' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधवने सांभाळली आहे. तर ऋषी विरमानु यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी साकारली आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत विनोद भानुशाली, संदीप सिंह आणि कमलेश भानुशाली यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

पंकज त्रिपाठींचा सिनेप्रवास (Pankaj Tripathi Movies)

पंकज त्रिपाठी यांच्या 'ओएमजी 2' (OMG 2) आणि 'फुकरे 3' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. त्यांची 'कडक सिंह' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपुर'मुळे त्यांना चांगली ओळख मिळाली आहे. या सिनेमात त्यांनी साकारलेली सुल्तान कुरैशीची भूमिका चांगलीच गाजली. पंकज त्रिपाठी सध्या 'मैं अटल हूं' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल. 'मेट्रो इन दिनो' आणि 'स्त्री 2' या सिनेमांचही ते शूटिंग करत आहेत.

'मैं अटल हूं' कधी रिलीज होणार? (Main Atal Hoon Release Date)

'मैं अटल हूं' हा सिनेमा 19 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. 'मैं अटल हूं' या सिनेमात पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.

संबंधित बातम्या

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींना राजकारणात करायचं होतं करिअर; 'त्या' घटनेने बदलला निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
Shaurya Patil: माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Balraje Patil On Ajit Pawar : चॅलेंज देणाऱ्यांना दादा माफ करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
Shaurya Patil: माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
Kalyan Crime News: ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
Kagal Nagar Palika Election: कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
Maharashtra Temperature Today: दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
Embed widget