Panchayat 4 Release Date : कसं असणार 'पंचायत-4' चे कथानक? ओटीटीवर कधी रिलीज होणार?
Panchayat 4 Release Date: 'पंचायत-3' सध्या ट्रेंड करत असून प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आता 'पंचायत-4' ची चर्चा सुरू झाली आहे.
Panchayat 4 Release Date : ओटीटीवरील लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक असलेली सीरिज पंचायतचा (Panchayat Season 3) तिसरा सीझन 28 मे रोजी लाँच झाला. यामध्ये फुलेरा गावातील आणखी एक अनोखी गोष्ट दिसून आली. पंचायत-3 सध्या ट्रेंड करत असून प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आता 'पंचायत-4' ची चर्चा सुरू झाली आहे. 'पंचायत-3' च्या शेवटासह 'पंचायत-4' ची सुरुवात होतेय. पण आता पंचायतचा चौथा सीझन कधी येणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
पंचायत-3 सीझनमध्ये रघुबीर यादव, जितेंद्र कुमार, सांविका, नीना गुप्ता आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. पंचायत -3 मध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी दिसून येत आहे. आता पंचायतच्या चौथ्या सीझनमध्ये काय दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
'पंचायत-4' ची रिलीज डेट काय?
काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत वेब सीरिजचे चार सीझन रिलीज होणार आहेत. आतापर्यंत तीन सीझन रिलीज झाले आहेत. पंचायत-3 च्या प्रमोशन दरम्यान अभिनेता चंदन रॉय याने सांगितले होते की, पंचायत-4 चा प्लॉट पूर्णपणे तयार आहे. आता फक्त शूटिंग सुरू होणे बाकी आहे.
पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये 2-2 वर्षांचे अंतर आहे. पण 'पंचायत 4' पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे. काही वृत्तांनुसार, 'पंचायत 4' ची रिलीज डेट 2026 या वर्षाच्या सुरुवातीला असल्याचे सांगितले आहे.'पंचायत 4' कधी येणार आणि कधी नाही याची अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
'पंचायत-4' ची गोष्ट काय असणार?
'पंचायत 3' च्या क्लायमॅक्समध्ये सरपंच म्हणजे प्रधानजी हे जीवघेण्या हल्ल्यामुळे रुग्णालयात दाखल होतात. रुग्णालयात त्यांना पाहून सचिवजी संतापतो. रुग्णालयाच्या बाहेर येताच सचिवजी सरपंच अर्थात प्रधानजींना भेटायला येणारे आमदार दिसतात. प्रधानजींच्या या स्थितीसाठी आमदार आणि त्याची माणसे जबाबदार असल्याचा संशय सचिवजींना आहे. अशा परिस्थितीत सचिव जी, प्रल्हाद जी, विकास बम बहादू आणि सचिव जीचा एक मित्र आमदारांच्या माणसांशी भांडू लागतात. मग पुढे आणखी काही घडामोडी घडतात. 'पंचायत-3' ची कथा ही 'पंचायत-4' मध्ये पूर्ण होणार आहे. मात्र, पंचायतच्या चौथ्या सीझनसाठी प्रेक्षकांना किमान एक ते दोन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.