Panchayat Actor Struggle : कधी सैफ-करीनाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये होता वेटर,ओटीटीवर 'दामाद'जी म्हणून सोडलीय छाप
Panchayat Actor Struggle : दरवर्षी हजारोंच्या संख्येने अनेक होतकरू कलाकार अभिनेता, अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत दाखल होतात. मात्र, फार कमी जणांना सिनेइंडस्ट्रीत संधी मिळते आणि त्यातीलही काहींच्या पदरी यश मिळते.
Panchayat Actor Struggle : दरवर्षी हजारोंच्या संख्येने अनेक होतकरू कलाकार अभिनेता, अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत दाखल होतात. मात्र, फार कमी जणांना सिनेइंडस्ट्रीत संधी मिळते आणि त्यातीलही काहींच्या पदरी यश मिळते. अनेक कलाकारांच्या स्ट्रगलच्या गोष्टीदेखील समोर येतात. 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये 'गज्जब बेज्जती है यार'! हा गाजलेला डायलॉग अनेकांच्या मनात स्थान मिळवून आहे. हा डायलॉग मीमर्सच्या आवडीचा डायलॉग होता. यावर अनेक मीम्स तयार झाले. फुलेरा गावचा जावई असलेला गणेश अर्थात आसिफ खान ( Asif Khan) याने पंचायतच्या पहिल्या सीझनमधील सर्वात राग आणणारी व्यक्तीरेखा ते सीझन 3 मध्ये लोकांच्या आवडीची व्यक्तीरेखा आसिफने साकारली आहे. त्याच्या स्ट्रगलच्या काळातील गोष्ट फार कमी लोकांना ठावूक असेल.
'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत आसिफ खानने आपल्या स्ट्रगलच्या दिवसातील गोष्ट सांगितली. आसिफ खानने म्हटले की, मुंबईत स्वत:चे पाय रोवणे ही सोपी गोष्ट नव्हती. वडिलांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर स्वत:चा खर्च भागवण्यासाठी छोटी-मोठी कामे करावी लागली. 2010 पर्यंत आपल्याला अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आसिफने आपल्या आईला राजी केले होते.
हॉटेलमध्ये काम केले....
आसिफने सांगितले की, स्वत: चा खर्च भागवण्यासाठी मी एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करणे सुरू केले होते. काही महिन्यानंतर मी किचन डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो. त्यावेळी हॉटेलमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही पार्टी सैफ अली खान आणि करीना कपूरची वेडिंग रिसेप्शन पार्टी होती.
आसिफने पुढे सांगितले की, काही काळानंतर हॉटेलमधील नोकरी सोडून मी एका मॉलमध्ये काम केले. त्याच दरम्यान काही ऑडिशन दिले आणि जयपूरमधील एका थिएटर ग्रुपला जॉईन झालो असे आसिफने सांगितले.
त्यानंतर कास्टिंग असिस्टंट म्हणून आसिफने आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘परी’, ‘पगलॅट’ आणि ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ या सारख्या चित्रपटात कॅमिओ, छोट्या भूमिका साकारत करिअरची सुरुवात केली.
'जमतारा'ने दिली ओळख
आसिफला आपल्या करिअरमधील मोठा ब्रेक मिळाला. 2020 मध्ये रिलीज झालेला जमतारा या वेब सीरिजमध्ये त्याच्या वाटेला महत्त्वाची भूमिका आली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आसिफने त्यानंतर पाताल लोक आणि मिर्झापूर काही वेब सीरिजमध्ये काम केले. ग्रेट इंडियन फॅमिलीमध्येही तो झळकला होता.
आसिफ आता सेक्शन 108, काकुडा, नोरानी चेहरा, इश्क चकल्लास, द वर्जिन ट्री आदीमध्ये झळकणार आहे.