Ushna Shah Wedding : पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहा भारतीय नववधूच्या रुपात, लग्नासाठी केलेल्या लूकवरुन होतेय ट्रोल
Pakistani Actress : पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहाने लग्नात भारतीय नववधूचा लूक केला होता.
Pakistani Actress Ushna Shah Troll : पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहा (Ushna Shah) नुकतीच हमजा अमीनसोबत (Hanza Amin) लग्नबंधनात अडकली आहे. नवविवाहित जोडप्याचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये भारतीय नववधूच्या लूकमध्ये उस्ना दिसत आहे. पाकिस्तानी अभिनेत्रीने लग्नसोहळ्यात भारतीय नववधूचा लूक केल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
लाल रंगाचा लेहेंगा, बांगड्या, झुमके, दागिने असा काहीसा उस्नाचा नववधू लूक होता. अभिनेत्रीच्या फोटोवर, पाकिस्तानची स्वत:ची संस्कृती आहे, नकारात्मकता पसरवणं बंद कर, पाकिस्तानी वधू भारतीय नववधूचा लूक का करत आहेत?, भारतीय संस्कृतीला पाकिस्तानात आणण्याचा प्रयत्न करु नको, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
They are fooling people by promoting Indian culture in the name of Pakistani culture.
— Syed Kazim Mehdi Rizvi (@SyedKazimMehdi9) February 27, 2023
We shouldn't tolerate it as it spoils our own culture, traditional values and religious values as well.#UshnaShah#جاوید_نہیں_ننگے_تم_ہوئے_ہو pic.twitter.com/1SjuXZTFxr
अभिनेत्रीने घेतली ट्रोलर्सची शाळा
पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहाने आता ट्रोलर्सची शाळी घेतली आहे. अभिनेत्री नववधूच्या लुकमधील फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "माझ्या लग्नसोहळ्यात ज्यांना आमंत्रण नव्हतं ते माझ्या लूकची चर्चा करत आहेत. माझ्या नववधूच्या लूकवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. माझ्या लूकची अडचण असणाऱ्यांना माझं सांगणं आहे की, मी परिधान केलेले कपडे तुम्ही विकत घेतलेले नाहीत. माझं माझ्या देशावर अर्थात पाकिस्तानवर प्रेम आहे. न बोलावलेल्या फोटोग्राफरचे खूप खूप आभार".
View this post on Instagram
पाकिस्तानी अभिनेत्रीला एकीकडे ट्रोल केलं जात असताना काही मंडळींनी मात्र तिचं समर्थन केलं आहे. नेटकऱ्यांनी लिहिलं आहे, लग्नाच्या दिवशी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणाऱ्या अभिनेत्रीचं खूप-खूप कौतुक, उस्ना शहा-हमजा अमीन कायम आनंदी राहा आणि ट्रोलर्स तुम्ही मात्र आनंदी राहिला नाहीत तरी चालेल, प्रत्येक गोष्टीचा आपण सकारात्मक विचार का करु शकत नाही." एकंदरीतच सध्या उस्ना शहाचा लग्नसोहळा आणि नववधू लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे.
संबंधित बातम्या