एक्स्प्लोर
शाहरुखच्या 'रईस'मधून माहिरा खानचा पत्ता कट?
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'रईस' चित्रपटातून पाकिस्तानी कलाकार माहिरा खानला रिप्लेस करण्यात येणार असल्याचं कळतं. उरी हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये पाकिस्तानविरोधात संतप्त भावना आहेत. फवाद खानपासून ते माहिरा खानपर्यंत सर्वच पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम देऊ, नये अशी मागणी झाली होती. त्यानंतर आता माहिरा खानला रिप्लेस करणार असल्याचं वृत्त 'डीएनए'ने दिलं आहे.
'डीएनए'च्या वृत्तानुसार, निर्मात्याला सिनेमाच्या प्रदर्शनानंतर विरोध होऊ नये, यासाठी माहिरा खानला रिप्लेस करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.
शाहरुख खानचा 'रईस' हा सिनेमा जानेवारीत प्रदर्शित होत आहे.
या सिनेमातून पाकिस्तानी कलाकार माहिरा खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. या सिनेमाचे शूटिंगही जवळपास पूर्ण होत आले होते. मात्र याच दरम्यान माहिरा खानला रिप्लेस करणार आहे.
"निर्माता रितेश सिधवानींसाठी हा सर्वात कठीण निर्णय होता. उरी हल्ल्यानंतर या सिनेमातील मुख्य अभिनेत्रीला रिप्लेस करण्यासाठी दबाव वाढत होता. वाढत्या विरोधामुळे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणे अडचणीचे झाले होते. त्यामुळे अनेकांनी या सिनेमाचे शूटिंग देशाबाहेर करण्याचा सल्ला दिला. मात्र ते शक्य नसल्याने माहिरा खानला या सिनेमातून हटवण्यात आलं आहे," असं 'डीएनए'ने वृत्तात म्हटलं आहे.
माहिराचा पत्ता कट झाल्यानंतर तिच्या जागी बॉलिवूड अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. 'रईस'च्या टीमला दोन आठवड्यात नवी अभिनेत्री शोधायची आहे, असं सुत्रांनी सांगितल्याचं 'डीएनए'च्या वृत्तात म्हटलं आहे.
पाकिस्तानी कलाकारांना मनसेचं अल्टिमेटम
उरी हल्ल्यानंतर मनसेने याप्रकरणी ताठर भूमिका घेत, पाकिस्तानी कलाकारांना अल्टिमेटम देऊन बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याची मागणी केली होती. याशिवाय फवाद खानचा 'ए दिल है मुश्किल' आणि माहिरा खानचा 'रईस' हे चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, अशी धमकीही मनसेने दिली होती.
असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन वाद
शाहरुखच्या 'दिलवाले' या सिनेमाच्या प्रदर्शनावेळीही असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. याचा सर्वाधिक फटका चित्रपट निर्मात्याला बसला. विशेष म्हणजे, 'रईस' चित्रपटाच्या शूटिंगवेळीही गुजरातमध्ये शाहरुखला कडाडून विरोध झाला होता. त्यामुळे शाहरुख खान आणि सिनेमा निर्माता कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाहीत. यातूनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतं.
पाक कलाकारांवरच्या बंदीवरुन बॉलिवूडमध्ये मतभेद
दरम्यान, 'द इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर'ने भारत-पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण निवळेपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंदी घातली होती. यानंतर बॉलिवूडमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. सलमान खान, करण जोहर, हंसल मेहता आणि अनुराग कश्यप यांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणे चुकीचे असल्याचे म्हटले होतं. तर रणदीप हुड्डा, सोनाली बेंद्रे आणि नाना पाटेकर आदींनी पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीचे समर्थन केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement