एक्स्प्लोर
अॅण्ड ऑस्कर गोज टू...ग्रीन बुक...
कथानकाची दमदार मांडणी, प्रत्येक पात्रांचं एकमेकांसोबतच बॉंडिंग, कहाणीचा फ्लो एकदम परफेक्ट असल्यामुळेच ऑस्करच्या शर्यतीत बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब सारख्या पुरस्कार सोहळ्याच मोहर उमटवणारे रोमा, दी फेव्हरिट, बोहेमिन ऱ्हॅप्सडीसारखे चित्रपट असताना ग्रीन बुकनं बाजी मारली.
नाव जरी एखाद्या पुस्तकाचं असलं तरी कथानक मोठ्या प्रवासावर आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट म्हणजे काळे गोरे या वर्णभेदावर आपण अनेक चित्रपट पाहिले, मात्र तो विषय एका नव्या कथानकात आला की कसा आकर्षक होतो हे आपल्याला ग्रीन बुक पाहताना दिसते. म्हणूनच की काय सारख्याच विषयावर आधारित ब्लॅकक्लान्सेमन सारखा चित्रपट शर्यतीत असताना आणि रोमा सारखा ऑस्करवर छाप सोडणारा चित्रपट समोर असतानाही ग्रीन बुकनं बाजी मारली.
कालखंड साधारण 1962च्या नोव्हेंबर-डिसेंबरचा…वर वर पाहता तीन प्रमुख पात्र दिसत असली तरी चित्रपट प्रामुख्यानं दोनच पात्रांभोवती फिरताना दिसतो. टोनी मॉर्टेन्सन(रंगानं गोरा) आणि कृष्णवर्णीय डॉक्टर डोनाल्ड (माहेरशाला अली) यांचा एक अनोखा प्रवास ग्रीन बुकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
टोनी (विगो मोर्टेंसेन) एका क्लबमध्ये कामाला असतो. त्यात झालेल्या एका घटनेनंतर त्याला नव्या कामाची गरज भासते, अर्थात तो बेकार होतो. त्यावेळी त्याच्या क्लब मालकाकडून एका डॉक्टरला ड्रायव्हर हवाय अशी माहिती मिळते. टोनी डॉक्टरच्या भेटीला जोतो. डॉक्टर डोनाल्ड (माहेरशाला अली), एक कृष्णवर्णीय आणि प्रसिद्ध पियानो वादक, संगीतकार... त्याला त्याच्या एका मोठ्या म्युझिकल टूरसाठी ड्रायव्हर कम असिस्टन्टची गरज असते. तसं पाहिले तर दोघांनाही एकमेकांची जास्त गरज असते. टोनी रंगाने गोरा असल्याने डोनाल्डला त्याचा फायदा होणार हे लक्षात येते, आणि टोनीला नोकरी मिळते.
चित्रपटाचे नाव साठच्या दशकात कृष्णवर्णीयांसाठी तयार केलेल्या मार्गदर्शिकेच्या नावावरुन देण्यात आले आहे. या मार्गदर्शिकेत कृष्णवर्णीयांनी कोण-कोणत्या भागात जायचे आणि कोणत्या वेळी जायचे, त्याचबरोबर किती वेळ त्यांनी एका ठिकाणी रहायचे अशा गोष्टींचा समावेश आहे. डोनाल्ड टोनीला सुरुवातीलाच टोनीला ग्रीन बुक ही मार्गदर्शिका देतो, मात्र त्यावेळी चित्रपट पाहतांना त्यात काही विशेष वाटतं नाही, मात्र हळूहळू त्याचं महत्व कळतं.
या चित्रपटातील दोन गोष्टी आवर्जून लिहितो.
1. टोनी जो इटालियन-अमेरिकन असतो, त्यामुळे त्याची भाषा प्रचंड अशुद्ध असते. इंग्लिशही अशुद्ध पद्धतीने बोलतात हेही आपल्याला इथेच दिसते. तर टूरवर असलेल्या टोनीला आपल्या बायकोसाठी पत्र लिहिताना होणाऱ्या अडचणीचा एक सीन आहे. ज्यात टोनीने शाळेत शिक्षकांना सुट्टीचा अर्ज केल्याप्रमाणे पत्र लिहितो. हीच बाब जेव्हा डोनाल्डच्या लक्षात येते तेव्हा तो ते पत्र पाहतो आणि हसतो सबोतच त्याला विचारतो काय लिहायचे आहे, तर टोनी त्याला उत्तर देत, “मला तूझी खुप आठवण येत आहे, मी बरा आहे आणि लव्ह यू...” त्यावेळी डोनाल्ड टोनीला त्याच्याच भावना वेगळ्या शब्दात मांडतो, आणि जेव्हा पत्र बायको वाचते तेव्हाच तिला कळते की भावना टोनीच्याच आहेत मात्र पत्राची भाषा त्याची नव्हती.
VIDEO | अॅण्ड ऑस्कर गोज टू...ग्रीन बुक... | ढॅण्टॅढॅण | एबीपी माझा
2. किस्सा दुसरा जो आपल्या सगळ्यांना शाळेत शिकवला असेल की रस्त्यावर पडलेली वस्तू उचलून खिश्यात घालायची नाही, मात्र आपण किती पाळतो तो वेगळा विषय आहे, ग्रीन बुक चित्रपटात टूर असलेल्या टोनी आणि डोनाल्ड गाडीच पेट्रोल भरण्यासाठी एका पंपावर थांबतात, त्यावेळी टोनी एका स्पेशल दगडांच्या स्टॉलसमोरुन एक दगड उचलून खिश्यात घालतो. तो दगड टोनीनं चोरल्याचा गैरसमज डोनाल्डला होतो त्यामुळं तो दगड परत ठेवल्याशिवाय गाडी चालवायची नाही अशी ताकीद डोनाल्ड देतो. पाहून थोड हसू येईल पण आपले किस्से देखील आठवतील हे नक्की. यासारखे अनेक किस्से या प्रवासात आपल्याला दिसतात. दिग्दर्शक फॅअर्ली यांनी कोणत्याही वर्णाच्या प्रेक्षकाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची पूर्ण काळजी या घेतल्याचं आपल्याला चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसते.
सगळ्यात शेवटी ज्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. आपल्या भाषेत सांगायचे झाले तर चित्रपटाच्या कथानकात मनोरंजनासह भावनेचा खेळही पाहायला मिळतो. बरं चित्रपट वर्णभेदावर असला तरी गोऱ्या रंगांच्या प्रेक्षकांनाही भावनेच्या आधारे छान पकडून ठेवतो. टोनी आणि त्याच्या बायकोच्या नात्यांतील गोडवा एक वेगळाच अनुभव देतो.
कथानकाची दमदार मांडणी, प्रत्येक पात्रांचं एकमेकांसोबतच बॉंडिंग, कहाणीचा फ्लो एकदम परफेक्ट असल्यामुळेच ऑस्करच्या शर्यतीत बाफ्टा आणि गोल्डन ग्लोबसारख्या पुरस्कार सोहळ्याची मोहर उमटविणारे रोमा, दी फेव्हरिट, बोहेमिन ऱ्हॅप्सडीसारखे चित्रपट असताना ग्रीन बुकनं बाजी मारली.
चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी लिंक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement