Oscar 2023 : "Everything Everywhere..." ते 'द एलिफंट व्हिस्परर्स'; ऑस्कर विजेते सिनेमे पाहा घरबसल्या
Oscar Awards : 95 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा नुकतीच झाली असून पुरस्कार विजेते सिनेमे प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकतात.
Oscar 2023 Winning Movies OTT : ऑस्कर पुरस्कार 2023 च्या (Oscars 2023) विजेत्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' (Everything Everywhere All At Once) या सिनेमाने 7 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार पटकावला आहे. ऑस्कर विजेते सिनेमे प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर कोणता सिनेमा पाहता येईल?
एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स (Everything Everywhere All At Once)
'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' या हॉलिवूड सिनेमाने 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. 7 वेगवेगळ्या कॅटेगरीतील पुरस्कारांवर या सिनेमाने आपलं नाव कोरलं आहे. 'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' या सिनेमाची ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सिनेमा प्रेक्षक प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात.
द एलिफंट व्हिस्परर्स (The Elephant Whisperes)
'द एलिफंट व्हिस्परर्स' या भारतीय लघुपटाने 'ऑस्कर 2023'मध्ये बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. हा माहितीपट प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
View this post on Instagram
नावल्नी (Navalny)
'बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म' या कॅटेगरीमध्ये नावल्नी (Navalny) या माहितीपटाला पुरस्कार मिळाला आहे. हा माहितीपट प्रेक्षक प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात.
ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट (All Quiet On The Western Front)
'ऑस्कर 2023'मध्ये ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट या सिनेमाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकतात.
आरआरआर (नाटू-नाटू)
'आरआरआर' या ब्लॉकबस्टर सिनेमातील नाटू-नाटू या गाण्याने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे. हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
View this post on Instagram
संबंधित बातम्या