एक्स्प्लोर
OSCAR 2019 | भारतात निर्मित लघु माहितीपटाला ऑस्कर, 'पिरीयड. एन्ड ऑफ सेन्टेन्स' सर्वोत्कृष्ट
उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात काठी खेडा गावात राहणाऱ्या स्नेह नावाच्या युवतीवर हा माहितीपट तयार करण्यात आला. भारतीय चित्रपट निर्मात्या गुनीत मोंगा यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे.
मुंबई : ऑस्कर पुरस्कारांच्या घोषणेनंतर भारतात अनपेक्षितपणे आनंदाची लकेर उमटली आहे. भारतीय युवतीवर आधारित 'पीरियड. एन्ड ऑफ सेन्टेंस'ला सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाचा ऑस्कर मिळाला.
उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात काठी खेडा गावात राहणाऱ्या स्नेह नावाच्या युवतीवर हा माहितीपट तयार करण्यात आला. भारतीय चित्रपट निर्मात्या गुनीत मोंगा यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. 35 वर्षीय गुनीत मोंगा यांनी द लंचबॉक्स, मसान, जुबान यासारख्या बॉलिवूडपटांची निर्मिती केली आहे. रयाक्ता जहताबची आणि मेलिसा बर्टन यांनी दिग्दर्शन केलं आहे.
हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री जाहीर झालेल्या 91 व्या ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात 'पीरियड. एन्ड ऑफ सेन्टेंस'ला पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर यूपीतील काठी खेडा गावात एकच जल्लोष झाला.
अॅण्ड ऑस्कर गोज टू...ग्रीन बुक...
नऊ लघु माहितीपटांना या विभागात नामांकन मिळालं होतं. समाजात मासिक पाळीकडे पाहण्याचा तुच्छ दृष्टीकोन या माहितीपटात अधोरेखित करण्यात आला आहे. महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न या माहितीपटातून केला आहे. स्नेहने गावातील मैत्रिणींसोबतच सॅनिटरी पॅड निर्मितीचा कारखाना तयार केला. 'हा आपला विजय आहे! या जगातील प्रत्येक युवतीने मनाशी खूणगाठ बांधावी, की ती देवी आहे. आपण @sikhya ला जगाच्या नकाशात ओळख मिळवून दिली' असं ट्वीट गुनीत मोंगा यांनी केलं आहे.WE WON!!! To every girl on this earth... know that you are a goddess... if heavens are listening... look MA we put @sikhya on the map ❤️
— Guneet Monga (@guneetm) February 25, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement