एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO | 'तुंबाड'चा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रदर्शित
अंगावर शहारा आणणारा 'तुंबाड' चित्रपट येत्या 12 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झालेल्या तुंबाड सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'हॅप्पी भाग जाएगी', 'राझंणा' आणि 'तनु वेड्स मनु' यांसारख्या सिनेमाचे निर्माते-दिग्दर्शक आनंद एल राय हे तुंबाडचे निर्माते आहेत. अंगावर शहारा आणणारा 'तुंबाड' चित्रपट येत्या 12 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
'तुंबाड'ची कथा 1920 च्या काळातील आहे. पुण्यात एक रहस्यमय घटना घडते. गावातील प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांभोवती चित्रपटाचं कथानक फिरतं.
'शिप ऑफ थिसियस' या सिनेमातून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता सोहम शाहची 'तुंबाड'मध्ये मुख्य भूमिका आहे. सिनेमाचं दिग्दर्शन राही अनिल बर्वे यांनी केलं आहे. ज्योती माळे, दीपक दामले, अनिता दाते, रंजिनी चक्रवर्ती यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाचं चित्रीकरण महाराष्ट्रातच झालं असून 12 ऑक्टोबरला हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement