Nitin Desai Suicide: नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी खालापूर पोलिसांनी पाच जणांवर दाखल केला गुन्हा
Nitin Desai Suicide: नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Nitin Desai Suicide: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्या प्रकरणी खालापूर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईसीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. त्या मानसिक त्रासाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे, अशी तक्रार नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी पोलिसांकडे केली आहे. नेहा यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 5 जणांविरुद्ध आयपीसीच्या कलम 306 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
2016 साली नितीन देसाईंच्या एनडीज आर्ट कंपनीने एडलवाईज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. एडलवाईज कंपनीकडून त्यांनी 2016 मध्ये 150 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये पुन्हा एकदा 35 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज घेण्यात आले. 2020 पासून कोरोना आणि टाळेबंदीमुळे कंपनीचे कर्जाचे हप्ते थकण्यास सुरुवात झाली. नितीन देसाई यांच्या कर्जाची एकूण थकबाकी 252 कोटी रुपये इतकी होती.
'मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमाच्या सेटवर नितीन देसाईंनी आत्महत्या केली. नितीन देसाईंच्या पार्थिवावर एन.डी. स्टुडिओंमध्ये अंत्यसंकार पार पडले. नितीन देसाई यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीवर देखील शोककळा पसरली. अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जितेंद्र जोशी,अमोल कोल्हे,अभिजीत पानसे यांनी शोक व्यक्त केला. तसेच विनोद तावडे ,सुप्रिया सुळे,नितीन देसाई, चित्रा वाघ या राजकीय नेत्यांनी नितीन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली आहे.
नितीन देसाई यांनी काही सुपरहिट हिंदी चित्रपटांचे सेट उभारले होते. 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या चित्रपटाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितीन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. नितीन देसाई यांनी शुन्यातून स्वर्ग निर्माण केला आहे. त्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. कला दिग्दर्शन सारख्या वेगळ्या क्षेत्रात नितीन देसाई यांनी मोलाचं काम केलं आहे. साईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे.
संबंधित बातम्या