Nitin Desai: 'नितीन देसाई हे काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत होते, माझे घेतलेले चित्र त्यांनी परत केले'; सोलापुरातील चित्रकार सचिन खरात यांची माहिती
Nitin Desai: "नितीन देसाई हे मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत होते, माझे घेतलेले चित्र त्यांनी परत केले", अशी माहिती सोलापुरातील चित्रकार सचिन खरात यांनी दिली आहे.
Nitin Desai: कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. एन.डी. स्टुडिओमध्ये (ND Studio) गळफास घेत त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. अद्याप त्यांच्या मृत्यूचं अधिकृत कारण समोर आलं नाही. सोलापुरातील चित्रकार सचिन खरात यांनी एबीपी माझाला नितीन देसाई यांच्याबद्दल माहिती दिली आहेत. "नितीन देसाई हे मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत होते, माझे घेतलेले चित्र त्यांनी परत केले", अशी माहिती सोलापुरातील चित्रकार सचिन खरात यांनी एबीपी माझाला दिली आहे. सचिन खरात यांचा दावा आहे की, कोविडने मोठे नुकसान केल्याचं देखील नितीन देसाई हे वारंवार म्हणत होते.
सचिन खरात यांनी सांगितलं की,"केवळ मुंबई, पुणेच नाही तर महाराष्ट्रातील कानकोपऱ्यातील कलाकारासोबत देखील नितीन देसाई यांचे संबंध होते. नितीन देसाई हे खिलाडी वृत्तीचे व्यक्ती होते, ते इतक्या टोकाचं पाऊल उचलतील असं वाटलं नव्हतं. 2021 मध्ये त्यांनी ND स्टुडिओत एक exhibition घेतलेलं होतं, त्यात 500 हून अधिक कलाकारांना मोफत सर्व सुविधा त्यांनी दिली."
पुढे सचिन खरात म्हणाले, "तब्बल 2 कोटी हून अधिकचा खर्च केवळ कलाकारांसाठी नितीन देसाई यांनी केला होता. त्याचं exhibition मध्ये माझं एक चित्र त्यांना आवडलेल होतं, त्यासाठीचे पैसे त्यांना मी सांगितले.पण नंतर त्यांचा मेसेज आला की मी हे पैसे देऊ शकणार नाही तुला हवं असेल तर चित्र परत घेऊन जा.त्यामुळे त्यांच्यावर पैशाचं बर्डन होतं असं दिसतंय.2020 पासून त्यांच्याकडे कोणतेही मोठे चित्रपट त्यांच्याकडे नव्हते. तीन चार वर्ष सलग चित्रपट नसताना एवढा मोठा स्टुडिओ चालवणे किती अवघड असेल याची आपण कल्पना करू शकतो.एखादा मोठा चित्रपट मोठा त्यांना मिळाला असता तर कदाचित ते आज आपल्यात असते."
नितीन देसाई (Nitin Desai) यांनी अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांचे सेट उभारले होते. '1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं. वयाच्या 58 व्या वर्षी नितीन देसाई यांनी आयुष्य संपवलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: