Nitesh Rane : नितीन देसाईंना धमकी मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून; नितेश राणेंचा गौप्यस्फोट
Nitesh Rane : नितीन देसाईंना धमकी मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून दिली गेली असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केला आहे.
Nitesh Rane On Nitin Desai : नितीन देसाईंना (Nitin Desai) धमकी मातोश्री जवळच्या माणसाकडून दिली गेली असल्याचा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच 'ठाकरे' (Thackeray) या सिनेमाचं शूटिंग एनडी स्टुडिओमध्ये (ND Studio) झालं होतं. त्याचे पैसे दिले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) आत्महत्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. देसाईंचा एन.डी.स्टुडिओ उद्धव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता, त्यासाठी मातोश्रीच्या जवळचा माणूस नितीन देसाईंना धमक्या देत होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला. याच मुद्द्यावरून त्यांनी संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
नितेश राणे काय म्हणाले?
नितेश राणे म्हणाले,"नितीन देसाई एक चांगले व्यक्ती होते. त्यांचा एन.डी स्टुडिओ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना हवा होता. नितीन देसाई यांच्यावर दबाव टाकला जात होता. मातोश्रीजवळच्या व्यक्तीकडून नितीन देसाई यांना धमक्या दिल्या जात होत्या. 'ठाकरे' सिनेमाचं शूटिंग नितीन देसाईंच्या एन.डी स्टुडिओमध्ये झालं होतं. त्याचे पैसे दिलेत का?" असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊतांनी (Sanjay Raut) याचे उत्तर द्यावे असे नितेश राणे म्हणाले.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू
नितीन देसाई आत्महत्या प्रकरण काही दिवसांपासून विविध कारणांने चर्चेत आहे. नितीन देसाई प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले होते,"नितीन देसाई यांंचं दुःख काय होतं.. हे जर सांगायला आम्ही तोंड उघडलं तर काही लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायलाही जागा होणार नाही". या विधानाने उदय सामंत यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित झाला होता.
सनी देओल यांना जो न्याय लावला हो नितीन देसाईंना का नाही? असा सवाल संजय राऊतांनी क्रेंद्र सरकारला केला आहे. सनी देओल आणि त्यांच्या बंगल्याला वाचवण्यात आलं मग हाच न्याय नितीन देसाई यांना का नाही देण्यात आला असं संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे नितीन देसाई हे उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागायला गेले तेव्हा मराठी उद्योजक यांना उद्धव ठाकरे यांच्या दरवाजावरून हाकलून दिले, मदत दिली नाही याची यादी सुद्धा माझ्याकडे आहे, असं भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या