Narendra Modi : पलक-मिथुनला दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा; म्हणाले,"आयुष्याच्या एका नवीन..."
Palak Muchhal- Mithun Sharma : पार्श्वगायिका पलक मुच्छल आणि संगीतकार मिथुन शर्मा लग्नबंधनात अडकले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Palak Muchhal- Mithun Wedding : बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार मिथुन शर्मा (Mithun Sharma) आणि पार्श्वगायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खास पत्र पाठवत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी पाठवलेले पत्र पलकने सोशल मीडियावर शेअर केले आहे. जोडप्याला आशीर्वाद देत पंतप्रधानांनी लिहिलं आहे,"पलक आणि मिथुन नवीन प्रवासासाठी शुभेच्छा. दोघांचं एकमेकांवरचं प्रेम आणि आपुलकी दिवसेंदिवस वाढत जावो. कायम एकत्र राहत एकमेकांची स्वप्न साकार करण्यासाठी एकमेकांना मदत करा. आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात करताना माझा आशीर्वाद आहेच. लग्नसोहळ्याला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद".
पलक आणि मिथुनने पंतप्रधानांचे मानले आभार
View this post on Instagram
पलक आणि मिथुनने पंतप्रधानांचे आभार मानत लिहिलं आहे,"आदरणीय मोदीजी, तुमचे आशीर्वादरुपी पत्र हृदयाला भिडणारं आहे. आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल खूप खूप आभार. आम्हाला तुमचा आशीर्वाद मिळणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे".
पलक आणि मिथुनच्या लग्नसोहळ्याला सेलिब्रिटींची हजेरी
पलक आणि मिथुनच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात सोनू निगम, सलमान खान, जॅकी श्रॉफ, हिमेश रेशमिया आणि एआर रहमान या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. लग्नानंतर पलकने सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"आज आम्ही दोघे एक झालो आहोत". त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर पलक आणि मिथुन लग्नबंधनात अडकले आहेत. मुंबईत पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर त्यांनी ग्रँड वेडिंग रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
संबंधित बातम्या























