एक्स्प्लोर

Neha Bhasin : 'स्वत:चं मूल नकोच...'; बिग बॉस फेम नेहा भसीनच्या वक्तव्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Neha Bhasin : माझी स्वत:ची मुलं असतील असा मी कधी विचार केलेला नाही. मला स्वत:चं मूल नकोच आहे, असं नेहा भसीन म्हणाली आहे.

Neha Bhasin : लोकप्रिय गायिका नेहा भसीन (Neha Bhasin) सध्या चर्चेत आहे. माझी स्वत:ची मुलं असतील असा मी कधी विचार केलेला नाही. मला स्वत:चं मूल नकोच आहे, असं नेहा एका मुलाखतीत म्हणाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. 

हिंदुस्तान टाइम्सने नेहा भसीनला खासगी आयुष्यासंबंधित अनेक प्रश्न विचारले. लग्नाला सहा वर्ष झाल्यानंतर आता पुढे काय? असं विचारलं असता नेहा म्हणाली,"इंग्रजी अल्बम ते वर्ल्ड टूर माझं प्रत्येक स्वप्न साकार करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मला असं वाटतं आयुष्यात मी कधी आई होणार नाही. पण मला अनाथआश्रम सुरू करायला आवडेल. त्यामुळे मला 10-12 मुलांची काळजी घेता येईल. त्यांना शिकवता येईल". 

नेहा पुढे म्हणाली," माझी स्वत:ची मुलं असतील असा मी कधी विचार केलेला नाही. मला स्वत:चं मूल नकोच आहे. पण अनाथ मुलांसाठी काम करायला मला आवडेल. त्यांच्यासाठी माझ्या मनात कायमच प्रेम आहे. बालपणापासूनच अनाथ मुलांना दत्तक घेण्याची माझी इच्छा होती. पण आता मला असं वाटतं की एक मुल दत्तक घेण्यापेक्षा जास्त काहीतरी मी करू शकते. त्यामुळे पुढल्या दोन-तीन वर्षांत मी यावर काम करणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)

नेहा भसीन 'बिग बॉस ओटीटी' आणि 'बिग बॉस 15'मुळे चर्चेत आली होती. नुकताच तिचा 40 वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त तिने खास पार्टीचे आयोजन केले होते. नेहा आज एक उत्तम गायिका असली तरी आयुष्यात तिला अनेक गोष्टी साध्य करायच्या आहेत.

नेहाने हिंदीसह पंजाबी, तामिळ आणि तेलुगू भाषेतील गाणीदेखील गायली आहेत. 2004 साली नेहाने संगीतक्षेत्रात पदार्पण केलं. पण 'फॅशन' या सिनेमामुळे तिला लोकप्रियता मिळाली. नेहाची 'जग घूमेया', 'कुछ खास', 'दिल दिया गल्ला' अशी अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. 

संबंधित बातम्या

Happy Birthday Neha Bhasin : आवाजाने तरुणांना घायाळ करणारी नेहा भसीन; हिंदी, पंजाबीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत डंका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJ. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
Embed widget