Nayanthara: पतीसोबत मंदिरात दर्शनासाठी गेलेली नयनतारा चाहत्यावर भडकली; व्हिडीओ व्हायरल
नयनतारा काही दिवसांपूर्वी विघ्नेश शिवनसोबत मंदिरात दर्शनासाठी गेली होती, यावेळी मंदिरात असणाऱ्या चाहत्यांनी नयनताराला पाहण्यासाठी गर्दी केली.
Nayanthara Lost Her Temper On Fan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि तिचा पती विग्नेश शिवन (Vignesh Shivan) हे दोघे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. नयनतारा काही दिवसांपूर्वी विघ्नेश शिवनसोबत मंदिरात दर्शनासाठी गेली होती, यावेळी मंदिरात असणाऱ्या चाहत्यांनी नयनताराला पाहण्यासाठी गर्दी केली. पांगुनी उठीरामच्या निमित्ताने हे जोडपे आपल्या कुटुंबासह मंदिरात दर्शनासाठी जाताना कॅमेऱ्यात कैद झाले. यावेळी नयनतारा ही तिच्या चाहत्यांवर भडकली.
जेव्हा नयनतारा ही तिच्या पतीसोबत मंदिरात दर्शनासाठी गेले होती तेव्हा तिच्या चाहत्यांनी तिचा व्हिडिओ शूट सुरुवात केली, ज्यापैकी एका चाहत्याचा नयनताराला राग आला. नयनताराच्या परवानगीशिवाय तिचा फॅन व्हिडिओ शूट करत होता. त्यामुळे तिला राग आला. नयनताराचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती चाहत्यावर राग व्यक्त करत आहे.
नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांना कुंभकोणमजवळील कामाक्षी अम्मान मंदिरामध्ये दर्शन घेताना चाहत्यांनी घेरले. चाहत्यांमुळे संतप्त झालेल्या नयनताराने चाहत्याचा फोन तोडण्याची धमकी दिली, तिचा पती विघ्नेश शिवन हा नयनतारा शांत करताना दिसला, तर पोलिसही गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसले.
पाहा व्हिडीओ:
नयनताराचा आगामी चित्रपट
नयनतारा ही जवान या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटामध्ये नयनतारा ही मुख्य भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. शाहरुखचा जवान हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच जवान या चित्रपटात विजय सेतुपती देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. नयनताराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
'नयनतारा बियोंड द फेरी टेल' या डॉक्युमेंट्रीमध्ये नयनतारा आणि विग्नेश यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. ही डॉक्युमेंट्री प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. नयनतारा आणि विग्नेश शिवन हे त्यांच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी नयनतारा आणि विग्नेश यांनी सोशल मीडियावर त्यांच्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केला होता. या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
Nayanthara Twins Name: नयनतारानं खास अंदाजात सांगितली जुळ्या मुलांची नावं; व्हिडीओ व्हायरल