एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाळासाहेबांवरील 'ठाकरे' सिनेमातील भूमिका खूपच टफ : नवाजुद्दीन
बाळासाहेब बोलताना कोट्या करत. त्यांची बोलण्याची फेक वेगळी होती. ती आत्मसात करून भूमिका साकारण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागत असल्याचे नवाजुद्दीन म्हणाला.
गोवा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बनत असलेल्या ‘ठाकरे’ सिनेमातील बाळासाहेबांची भूमिका साकारणे खुप कठीण आहे, असे बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला. तसेच, हा सिनेमा मराठी आणि हिंदीमध्ये बनवला जात आहे. मराठी माझ्यासाठी नवीन भाषा असल्याने त्यासाठी खास शिकवणी वर्ग लावले आहे. बाळासाहेबांच्या बोलण्याच्या लकबीवर खूपच मेहनत घ्यावी लागत असल्याचेही नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले.
बांबोळी येथील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये आयोजित ‘गोवाफेस्ट’मध्ये आयोजिय नॉलेज सेमिनारमध्ये अन्नू कपूर यांच्याशी संवाद साधताना सिद्दीकी यांनी ही माहिती दिली.
नवाजुद्दीन म्हणाला, “सध्या ‘ठाकरे’ या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे. येथून गेल्यानंतर पुन्हा त्याच शूटिंग करणार आहे. आयुष्यात इतक्या भूमिका केल्या, पण बाळासाहेबांची भूमिका सगळ्यात टफ आहे.”
बाळासाहेब बोलताना कोट्या करत. त्यांची बोलण्याची फेक वेगळी होती. ती आत्मसात करून भूमिका साकारण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागत असल्याचे नवाजुद्दीन म्हणाला.
अन्नू कपूर यांनी नवाजुद्दीनची मुलाखत घेतली. नवाजुद्दीनने छोट्याशा गावातून बडोदा, दिल्ली आणि मुंबई दरम्यान आयुष्यात घड़लेल्या घटना उपस्थितांसमोर उलगडून सांगितल्या. मुंबईमध्ये राहायचे झालेले वांदे, दिल्लीत खर्च भागवण्यासाठी केलेली सिक्युरिटी गार्डची नोकरी ते बॉलीवूडमधील एंट्रीपर्यंतचा प्रवासा नवाजुद्दीनने उलगडला.
पडद्यावरच्या भूमिका साकारण्यात वेगळे समाधान मिळते. रियल लाइफमध्ये तडजोड करण्यासाठी बरेच खोट बोलावं लागतं, पण रील लाईफमध्ये सत्य बोलून दाखवता येतं, असेही सांगत रील लाइफ रियल लाईफपेक्षा जास्त जवळचे वाटते, असेही नवाजुद्दीन म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement