एक्स्प्लोर

Navardev Bsc Agri: शेतकरी राजाची गोष्ट मांडणाऱ्या ‘नवरदेव Bsc Agri’चा ट्रेलर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 Navardev Bsc Agri Trailer out: अभिनेता क्षितिज दाते आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांचा नवरदेव Bsc Agri हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 Navardev Bsc Agri Trailer out: वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळते. आगामी मराठी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अशताच आता अभिनेता क्षितिज दाते (Kshitij Date) आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) यांचा नवरदेव Bsc Agri हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

शेतकरी राजाची गोष्ट मांडणारा 'नवरदेव Bsc Agri'

नवरदेव Bsc Agri या चित्रपटात शेतकरी राजाची गोष्ट मांडण्यात आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की गावातील एका तरुणाला शेतीमध्ये विविध प्रयोग करायचे असतात. अशातच या तरुण्याचे कुटुंब त्याचं लग्न लावून देण्याची तयारी करत असतात. शेतकऱ्याला लग्न करताना कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं? तसेच मुलीच्या कुटुंबाच्या आपेक्षा शेतकरी तरुण पूर्ण करु शकतो की नाही? हे नवरदेव Bsc Agri या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

चित्रपटाची स्टार कास्ट

नवरदेव Bsc Agri या चित्रपटात मकरंद अनासपुरे , क्षितिज दाते, प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर,गार्गी फुले, रमेश परदेशी,नेहा शितोळे, हार्दिक जोशी,तानाजी गलगुंडे, अनिरुद्ध खुटवड  या कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये  इतर कलाकारांची झलक देखील बघायला मिळते.

पाहा ट्रेलर:

View this post on Instagram
 
A post shared by Ultra_Marathi Buzz (@ultra_marathibuzz)

कधी रिलीज होणार चित्रपट?

नवरदेव Bsc Agri हा चित्रपट 26 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असून या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. प्रियदर्शिनी इंदलकरनं या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला कमेंट करुन अनेकांनी ट्रेलरचं कौतुक केलं आहे. 

प्रियदर्शिनी इंदलकरला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील प्रियदर्शिनीच्या विनोदी शैलीचं अनेक जण कौतुक करतात. तसेच 'लोकमान्य' या मालिकेतून क्षितिज दाते हा प्रेक्षकांच्या भेटीला आला.  आता क्षितिज दाते आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नवरदेव Bsc Agri या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Prithvik Pratap: पृथ्वीक आणि प्रियदर्शनीनं ‘चलेया’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, समीर चौघुले कमेंट करत म्हणाला, "मी आधीच म्हणत होतो..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update | जखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफ अली खानवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 16 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 16 January 2025Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Embed widget