(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महेश बाबूचा सावत्र भाऊ चौथ्यांदा चढणार बोहल्यावर? नरेशनं शेअर केली खास पोस्ट
नरेशनं (Naresh Babu) नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील नरेश आणि पवित्रा (Pavitra Lokesh) यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Naresh Babu: अभिनेता नरेश बाबू (Naresh Babu) आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश (Pavitra Lokesh) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या नरेश हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नरेश हा गेल्या काही दिवसांपासून पवित्राला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. नरेशनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील नरेश आणि पवित्रा यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
नरेशनं एक खास व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला नरेशनं कॅप्शन दिलं, 'नवीन वर्ष, नवीन सुरुवात, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. आमच्याकडून तुम्हा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा.' व्हिडीओमध्ये नरेश आणि पवित्रा यांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. व्हिडीओमध्ये नरेश आणि पवित्रा हे केक कट करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी, ''Getting Married Soon' असं लिहिलेलं दिसत आहे. नरेशनं या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये पवित्र-नरेश या हॅशटॅगचा वापर केला आहे. नरेशनं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले. पवित्रा आणि नरेश हे लग्नगाठ बांधणार आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
पाहा व्हिडीओ
New Year ✨
— H.E Dr Naresh VK actor (@ItsActorNaresh) December 31, 2022
New Beginnings 💖
Need all your blessings 🙏
From us to all of you #HappyNewYear ❤️
- Mee #PavitraNaresh pic.twitter.com/JiEbWY4qTQ
नरेशचे याआधी तीन वेळा लग्न झाले आहे. आता नरेश चौथ्यांदा बोहल्यावर चढणार आहे, असं म्हटलं जात आहे. अल्लरी, हिरो यांसारख्या चित्रपटात नरेशनं काम केलं आहे. तो महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे. नरेशने शेअर केलेला व्हिडीओ हा त्याच्या आगामी चित्रपटाचा प्रोमो आहे का की खरंच तो पवित्रासोबत लग्न करणार आहे? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
पवित्रा लोकेश ही तिचा पहिला पती सुचेंद्र प्रसादपासून विभक्त झाली आहे, परंतु कायदेशीररित्या नाही. त्यामुळे आता पवित्रा नरेशसोबत लग्न करण्यासाठी घटस्फोट घेईल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच चाहत्यांना मिळेल. पवित्रा लोकेश ही अभिनेते मैसूर लोकेश यांची मुलगी आहे. पवित्रानं जवळपास 150 कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मिस्टर अभिषेक, मेकअप, स्टुडंट, मेल्ला या कन्नड चित्रपटांमध्ये तिनं महत्वाची भूमिका साकारली आहे. तसेच तिनं तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: