Sana Saeed: 'कुछ कुछ होता है' फेम अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनं केलं 'फिल्मी स्टाईल' प्रपोज; व्हिडीओ व्हायरल
नुकताच सनानं (Sana Saeed) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सनाचा बॉयफ्रेंड हा तिला फिल्मी स्टाईलनं प्रपोज करत आहे.
Sana Saeed: कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai) या हिट चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटातील अंजली आणि राहुल यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात अंजली ही भूमिका काजोलनं साकारली तर राहुल ही भूमिका शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) साकारली. कुछ कुछ होता है या चित्रपटात राहुलच्या मुलीची भूमिका अभिनेत्री सना सईदनं (Sana Saeed) साकारली. नुकताच सनानं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सनाचा बॉयफ्रेंड हा तिला फिल्मी स्टाईलनं प्रपोज करत आहे.
सबा वॅगनर या सनाच्या बॉयफ्रेंडनं सनाला ब्लू कलरची डायमंड रिंग देऊन प्रपोज केलं. सनानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सबा आणि सनाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. सबा हा हॉलिवूड साउंड डिझायनर आहे. तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो. सबानं अनेकदा सनासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सनाच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स:
तनुज विरवानी, रिजवान,परजान दस्तूर या सेलिब्रिटींनी सनानं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सनाच्या चाहत्यांनी देखील तिनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन सना आणि साबाला शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
सनानं कुछ कुछ होता है या चित्रपटाबरोबरच स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटामध्ये देखील काम केलं. तिनं खतरों के खिलाजी, नच बलिये-7, झलक दिखला जा या शोमध्ये काम केलं आहे.