(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gadar 2: 'गदर-2' मध्ये ऐकायला मिळणार नाना पाटेकर यांचा आवाज; सकिना आणि तारा सिंहची प्रेमकहाणी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'गदर 2' (Gadar 2) चित्रपटामध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
Gadar 2: अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेलचा (Ameesha Patel) यांचा गदर-2 (Gadar 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच या चित्रपटातील ‘उड जा काले कावा’ हे गाणं देखील काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. आता चित्रपटाबाबत एक अपडेट तरण अदर्श यांनी ट्विटवर दिली आहे. गदर-2 चित्रपटामध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा आवाज प्रेक्षकांना ऐकू येणार आहे, अशी माहिती तरण आदर्शन यांनी ट्विटरवर दिली आहे.
तरण आदर्शन यांनी याबाबत माहिती दिली आहे. तरण आदर्शन यांनी नाना पाटेकर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'नाना पाटेकर हे 'गदर 2' या चित्रपटासाठी व्हॉइस ओवर करत आहेत. नानांचा व्हॉइसओव्हर गदर-2 या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच प्रेक्षकांना ऐकू येणार आहे. 2001 मध्ये गदर चित्रपटाच्या इंट्रोडक्शनच्या सीनसाठी ओमपुरी यांनी व्हॉईस ओव्हर केला होता.' आता 'गदर 2' चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
#Xclusiv… NANA PATEKAR DOES VOICEOVER FOR ‘GADAR 2’… #NanaPatekar has lent his voice for #Gadar2… #Nana’s voiceover will introduce #Gadar2 to the moviegoers at the very start of the film.
— taran adarsh (@taran_adarsh) July 3, 2023
It may be recalled that #OmPuri had done the voiceover for the introductory scenes of… pic.twitter.com/m6Cj9ergZB
नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयानं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्मिण केली. नाना पाटेकर यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. नटसम्राट, डॉ प्रकाश बाबा आमटे या मराठी चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांनी काम केलं. तर वेलकम बॅक, तिरंगा, शक्ती, अंगार या हिंदी चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली.
'गदर 2' मध्ये सनी देओल आणि अमिषा पाटेल हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'गदर 2' हा चित्रपट 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अमिषानं सकिना ही भूमिका साकारली होती तर सनी देओलनं तारा सिंह ही भूमिका साकारली होती. आता तारा सिंह आणि सकिना यांची प्रेमकथा पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: