Nagraj Manjule : 'झुंड','घर बंदूक बिरयानी' नंतर नागराज मंजुळे झळकणार 'या' सिनेमात; अमेय वाघसोबत करणार स्क्रीन शेअर
Nagraj Manjule : नागराज मंजुळे यांचा 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
Nagraj Manjule New Marathi Movie : आशेच्या भांगेची नशा भारी असलेला नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची नागराजच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. आता लोकसत्ताला दिलेल्या एका मुलाखतीत नागराज यांनी त्यांच्या आगामी सिनेमाबद्दल भाष्य केलं आहे.
'घर बंदूक बिरयानी' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळे म्हणाले,"झुंड', 'घर बंदूक बिरयानी' नंतर मी आणखी एका मराठी सिनेमात झळकणार आहे. 'फ्रेम' असं या सिनेमाचं नाव आहेय. या सिनेमात मी अमेय वाघसोबत (Amey Wagh) स्क्रीन शेअर करताना दिसेल. आजवर मी अनेक सिनेमांत छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. पण दिग्दर्शक-निर्माता हे जास्त चांगलं आहे".
View this post on Instagram
नाजराजच्या 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहेच. पण आता 'फ्रेम' या सिनेमाचीदेखील ते आतुरतेने वाट पाहत आहे. नाजराज आणि अमेय वाघची जोडी काय धुमाकूळ घालणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या सिनेमातदेखील प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
महाराष्ट्रातील कलाकारांमुळे 'घर बंदूक बिरयानी' होणार अधिकच चविष्ट
'घर बंदूक बिरयानी' या सिनेमात सयाजी शिंदे, नागराज पोपटराव मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील हे प्रमुख भूमिकेत असले तरी असेही काही कलाकार आहेत ज्यांच्या अभिनय शैलीने ही बिर्याणी अधिकच लज्जतदार बनली आहे. 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमात महाराष्ट्राच्या विविध भागांतील कलाकारांनी काम केलं आहे. ज्याप्रमाणे बिर्याणी रुचकर बनवण्यासाठी त्यात विविध जिन्नस वापरले जातात, ज्याची प्रत्येकाची एक खासियत असते. तशीच खासियत असलेले महाराष्ट्रातील कलाकार 'घर बंदूक बिरयानी' मध्ये दिसणार आहेत.
'घर बंदूक बिरयानी' 7 एप्रिलला येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Ghar Banduk Biryani Release Date)
'घर बंदूक बिरयानी' या सिनेमातील कलाकारांबद्दल बोलताना नागराज मंजुळे म्हणाले,"घर बंदूक बिरयानी' या सिनेमातील सर्वच कलाकार खूप मेहनती आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील हे कलाकार असल्याने प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे ही बिर्याणी अधिकच चविष्ट होणार आहे". येत्या 7 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या