एक्स्प्लोर

Nagraj Manjule Naal 2 : 'आई मला खेळायला जायचंय' नंतर प्रेक्षक रमणार 'डराव डराव'मध्ये; नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2'मधील नवं गाणं आऊट!

Naal 2 Song : नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) 'नाळ 2' या सिनेमातील 'डराव डराव' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Nagraj Manjule Naal 2 Song Out : नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) 'नाळ 2' (Naal 2) या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल. या सिनेमातील 'भिंगोरी' (Bhingori) हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आता या सिनेमातील 'डराव डराव' (Darav Darav) हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ 2'मधील 'डराव डराव' गाणे ऐकले का?  अर्थात हे बच्चे कंपनीवर चित्रित करण्यात आलेले गाणे मोठ्यांनाही आवडेल असे आहे. चैतू, चिमू आणि मणी यांची धमाल असलेल्या या गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे असून या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी संगीत दिले आहे. तर या जबरदस्त गाण्याला जयेश खरे आणि मास्टर अवन यांचा आवाज लाभला आहे.

'नाळ' या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. आता 'नाळ 2' मधील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला लाभलेला नवोदित गायकाचा आवाज. मुळात नागराज मंजुळे हे आपल्या सिनेमांमध्ये नेहमीच नवोदितांना संधी देतात आणि हे कलाकार या संधीचे सोने करतात. सारेगमपमध्ये जयेश स्पर्धक आहे आणि तिथेच या सर्वांनी त्याला हेरले. खरं तर जयेश खरेने अल्पावधीतच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

चिमूने वेधलं लक्ष...

'डराव डराव' या गाण्यात विशेष लक्ष वेधून घेत आहे ती चिमुकली चिमू. एवढीशी गोड मुलगी तिच्या भावंडांसोबत धमाल करत आहेत. तिच्यातील हा गोडवा, निरागसता भावणारी आहे. ‘आई मला खेळायला जायचंय’ सारखेच हे गाणेही प्रेक्षकांना बालपणात रमवेल. आता या गाण्यामुळे ‘नाळ 2’ बघण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 'नाळ 2' हा सिनेमा 10 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

‘नाळ 2’मधील गाण्याबद्दल बोलताना नागराज मंजुळे म्हणाले,"आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्यात कला दडलेली असते. बऱ्याचदा ती आपल्या नजरेत येत नाही. त्यामुळे मी अशा कलाकारांना नेहमीच संधी देतो. त्यांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे आजवर माझी ही निवड नेहमीच योग्य ठरली आहे. अर्थात हे त्या कलाकारांचे यश. जयेश खरे त्यातलाच एक कलाकार. जयेशच्या आवाजात जादू आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याच्या या जादुई आवाजाने या गाण्यातूनही भावना व्यक्त होत आहेत". 

संबंधित बातम्या

Nagraj Manjule Naal 2 : 'जाऊ दे ना वं'च्या यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलं 'भिंगोरी'; नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2'ची प्रेक्षकांना उत्सुकता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी, 5 कोटींचा खर्च करणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी
Ambadas Danve: 'तुमचे चरण्याचे धंदे बंद करा 'तिजोरीच्या खडखडाटावरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल,म्हणाले ..
'तूप चाटून काय भूक जात नसते'..तिजोरीच्या खडखडाटावरून अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले..
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
'ज्यांना लंगोट घालण्याचं माहीत नाही, त्यांनी..'; अजित पवारांच्या आमदाराकडून रोहित पवारांची खिल्ली
'ज्यांना लंगोट घालण्याचं माहीत नाही, त्यांनी..'; अजित पवारांच्या आमदाराकडून रोहित पवारांची खिल्ली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal On Ajit Pawar : अजित पवारांकडून नाराजी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत?Vicky Kaushal At Grishneshwar Temple : विकी कौशलकडून घृष्णेश्वर मंदिरात विधीत पूजा, माझावर EXCLUSIVEDhananjay Munde : धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, वांद्रे कौटुंबीक न्यायालयाचा निर्णयDwarkanath sanzgiri Demise : क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी, 5 कोटींचा खर्च करणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी
Ambadas Danve: 'तुमचे चरण्याचे धंदे बंद करा 'तिजोरीच्या खडखडाटावरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल,म्हणाले ..
'तूप चाटून काय भूक जात नसते'..तिजोरीच्या खडखडाटावरून अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले..
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
'ज्यांना लंगोट घालण्याचं माहीत नाही, त्यांनी..'; अजित पवारांच्या आमदाराकडून रोहित पवारांची खिल्ली
'ज्यांना लंगोट घालण्याचं माहीत नाही, त्यांनी..'; अजित पवारांच्या आमदाराकडून रोहित पवारांची खिल्ली
Nashik Crime : नाशिकमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने सपासप वार, मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार
नाशिकमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने सपासप वार, मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार
Akshay Shinde Encounter : मोठी बातमी : आम्हाला ही केस लढवायची नाही, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका; कोर्टात नेमकं काय घडलं?
आम्हाला ही केस लढवायची नाही, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका; कोर्टात नेमकं काय घडलं?
करुणा शर्मांना 2 लाख पोटगी, कोर्टाच्या निर्णयावर धनंजय मुंडेंकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'लिव्ह इन रिलेशनशीप'
करुणा शर्मांना 2 लाख पोटगी, कोर्टाच्या निर्णयावर धनंजय मुंडेंकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'लिव्ह इन रिलेशनशीप'
Anjali Damania : धनजंय मुंडेंचा 2 तासांत राजीनामा घ्या, तिसरा तासही लागू नये; कोर्टाच्या निर्णयानंतर दमानिया आक्रमक
धनजंय मुंडेंचा 2 तासांत राजीनामा घ्या, तिसरा तासही लागू नये; कोर्टाच्या निर्णयानंतर दमानिया आक्रमक
Embed widget