एक्स्प्लोर

Munjya Box Office Collection Day 25 : 'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका

Munjya Box Office Collection Day 25 : 'कल्की 2898 एडी'मुळे मुंज्याच्या कोटींच्या कमाईला ब्रेक लागल्याचे चित्र होते. मात्र, तरिही 'मुंज्या'ने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.

Munjya Box Office Collection Day 25 :  आदित्य सरपोतदार (Adiytya Sarpotdar) दिग्दर्शित, शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा (Abhay Varma) यांची मुख्य भूमिका असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'ने (Munjya)  झोकात 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. कमी बजेटमध्ये निर्मिती, कोणताही मोठा चेहरा नसताना मुंज्याने चौथ्या आठवड्यातच 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. 

बॉक्स ऑफिसवर कल्की 2898 एडी चित्रपटाची लाट आलेली असतानादेखील मुंज्याने एका बाजूने आपली कमाई सुरू ठेवली आहे. 'कल्की 2898 एडी'मुळे मुंज्याच्या कोटींच्या कमाईला ब्रेक लागल्याचे चित्र होते. मुंज्याने 20 व्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर 90 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर आता 'मुंज्या'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली. 

 'मुंज्या'ने पहिल्या दिवशी 4 कोटींची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 35.3 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या आठवड्यात  ‘मुंज्या’ने 32.65  कोटी रुपयांची कमाई केली होती. आता चित्रपटाच्या रिलीजला चौथा आठवडा पूर्ण करण्याआधी  मुंज्याने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.  वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ने 118.51 कोटींची कमाई केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

यंदाच्या वर्षात ज्या मोठ्या चित्रपटांना जमले नाही ते  'मुंज्या'ने करून दाखवले आहे. या चित्रपटात कोणतीही मोठी स्टारकास्ट नाही. त्याशिवाय, चित्रपटाचे मोठे बजेट नाही. मात्र, कलाकारांचा दमदार अभिनय, चांगले कथानक यामुळे 'मुंज्या'ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'मुंज्या'च्या आधी बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्टारचे चित्रपट आले होते. पण,त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे. 

‘मुंज्या’ ने दिली मोठ्या चित्रपटांना मात...

 फक्त 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘मुंज्या’ ने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. या चित्रपटाने 350 कोटींचे बजेट असलेली  ‘बड़े मियां छोटे मिया’  आणि 200 कोटींचा बजेट असलेल्या अजय देवगणची भूमिका असलेल्या मैदान चित्रपटाला मात दिली आहे.  ‘बड़े मियां छोटे मिया’ ने बॉक्स ऑफिसवर 65 कोटींची कमाई केली. तर, 'मैदान'ने 52 कोटींची कमाई केली होती. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Anant Amabni-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
Maharaj Movie Netflix : वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...Ladaki Bahin Yojana Application : प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा, सेतू कार्यालयात गर्दीTeam India Cake Cut : हॉटेलमध्ये जल्लोष,  खास केकचं टीम इंडियाकडून कटींगTOP 100 Headlines : 2 July 2024: 6 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Anant Amabni-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
Maharaj Movie Netflix : वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
Sassoon Hospital : 'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो
'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो
रोहित शर्मा  ते सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात, मुख्यमंत्र्यांची भेट, भव्य सत्कार सोहळा!
रोहित शर्मा ते सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात, मुख्यमंत्र्यांची भेट
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hina Khan Video :  किमोथेरेपी आधी अभिनेत्री हिना खानचा 6 मिनिटांचा व्हिडीओ आला समोर, आई ढसा ढसा रडली
किमोथेरेपी आधी अभिनेत्री हिना खानचा 6 मिनिटांचा व्हिडीओ आला समोर, आई ढसा ढसा रडली
Embed widget