एक्स्प्लोर

मॉडेलच्या तक्रारीनंतर बॉलिवूडशी संबंधित अनेकांवर बलात्कार आणि छेडछाडीचा गुन्हा, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु

मॉडेलच्या तक्रारीनंतर मुंबईतील वांद्रे पोलिसांनी बॉलिवूडशी संबंधित नऊ जणांविरोधात बलात्कार आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : मुंबईत एका 28 वर्षीय मॉडेलने बॉलिवूडशी संबंधित अनेक नामवंत लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. मॉडलिंग विश्वात काम देण्याच्या नावावर अनेकांनी आपल्यासोबत छेडछाड केली तर एका फोटोग्राफरने बलात्कार केल्याचा आरोप या मॉडेलने केला आहे.

मॉडेलच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी नऊ जणांविरोधात आयपीसीच्या कलम 376 (एन) आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

मॉडेलने पोलिसांकडे नोंदवलेल्या आपल्या जबाबात म्हटलं आहे की, "मी 2014 पासून मॉडेलिंग करत आहे. काम मिळवून देण्याच्या नावावर अनेकांनी माझ्यासोबत छेडछाड केली. मुंबईत आल्यानंतर मॉडलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या गौरव शर्मा (स्ट्रोम फॅशन कंपनी), रोहित ज्युडजी (फोटोग्राफर) अनिरबान ब्लाह (क्वान कंपनी), आणि कॉलस्टन ज्युलियन (कमर्शियल फोटोग्राफर) यांच्या संपर्कात होते. मॉडलिंग सुरु केलं तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी ओळख गौरव शर्मासोबत झाली होती.

कोल्सटन ज्युलियनवर बलात्काराचा आरो
कोल्सटन ज्युलियनने 2014 ते 2018 च्या दरम्यान काम मिळवून देण्याच्या नावावर माझ्यावर अनेकदा बलात्कार केला. ज्युलियनने जानेवारी 2014 मध्ये मला फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली होती, जी मी स्वीकारली. यानंतर फेब्रुवारी महिन्यात मला ई-मेल पाठवून सांगितलं की, "dear @@@@@@ could you come to our office with your book, plz msg or call on 9821##### "

यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये त्याला भेटण्यासाठी गेले. त्यावेळी माझ्याकडे माझ्या फोटोंची हार्ड कॉपी नव्हती. त्यामुळे ज्युलियनला मी माझे सर्व फोटो मोबाईलवर दाखवले. त्यावर तो म्हणाला की, मी तुझे फोटो काढतो, ज्यांचा वापर सिनेमांमध्ये काम करण्यासाठी होईल. परंतु त्याने कधी कोणतंही फोटोशूट केलं नाही.

मॉडेलने आरोप केला आहे की, "काही दिवसांनी व्हॉट्सअॅपवर ज्युलियनचे मेसेज येऊ लागले आणि आमची मैत्री झाली. 21 एप्रिल 2014 रोजी ज्युलियनने मेसेज केला की, "we meet bandra and film" यानंतर मी त्याच्या घरी गेले. तिथे आमच्यात फोटोशूटबाबत चर्चा झाली आणि आमच्यात शारीरिक संबंधही झाले. यानंतर तो सातत्याने मला फोटोशूट किंवा सिनेमाच्या बहाण्याने बोलावायचा आणि आमच्यात शारीरिक संबंध होत असत.

काही दिवसांनी तो मला मॉडेलिंग बंद करण्यास सांगू लागला आणि यावरुन भांडण करायचा. याशिवाय कपड्यांबाबत किंवा केसांबाबत वाद घालायचा. यानंतर मला समजलं की त्याचे आणखी मुलींसोबतही संबंध आहेत.

मॉडेलने पोलिसांना सांगितलं की, "डिसेंबर 2015 मध्ये एका रात्री ज्युलियन माझ्या घराशेजारीच होता. त्याने मला बोलावलं आणि मग मला कुठेतरी घेऊन गेला. तिथे इच्छा नसतानाही त्याने माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घरी सोडण्यास सांगण्यावरुन आमच्यात वाद झाला आणि पण त्याने मला घरी सोडलं. त्याच्या या वागण्यामुळे मी त्या भेटणं बंद केलं आणि केवळ व्हॉट्सअॅपवरच त्याच्याशी बातचीत होत होती. 

मॉडेलने आरोप केला आहे की, "2016 मध्ये कामात व्यस्त असल्याने मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि एक दिवस तो परदेशात जाणार असल्याने मी त्याला भेटायला गेले." ऑगस्ट 2016 मध्ये मी त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला, मध्ये मध्ये त्याचा नंबर अनब्लॉक करायचे पण दोघांमध्ये फार बातचीत होत नव्हती.

मार्च 2017 मॉडेलने ज्युलियनला व्हॉट्सअॅपवर मॉडलिंगबाबत विचारलं, त्यानंतर त्याने तिला पुन्हा एकदा घरी बोलावलं. परंतु मी फोटोशूटसाठी रात्री येणार नाही, असं मी त्याला सांगितलं. यानंतर मी दुपारी तिथे गेले आणि स्वत:चा मेकअपही स्वत:च केला.

यादरम्यान ज्युलियनने जबरदस्तीने माझं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी नकार दिल्याने त्याने मला मारहाण केली, ज्यामुळे मी भिंतीवर जाऊन आदळले. यानंतर त्याने माझे केस ओढत स्वत:कडे खेचलं आणि पुन्हा मारहाण करु लागला. यानंतर तो माफी मागू लागला आणि रात्री इथेच थांबण्याची विनंती करु लागला. परंती मी तिथून बाहेर पडले आणि त्यानंतर ज्युलियनसोबतचे सर्व संबंध तोडले.

अनिरबान ब्लाहवरही गंभीर आरोप
अनिरबान ब्लाहसोबत फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाल्याचं मॉडेलनने सांगितलं. तिच्या आरोपानुसार "2016 मध्ये ब्लाहने माझ्याशी संपर्क केला आणि भेटण्यासाठी बोलावलं. दोन सिनेमात काम देण्याचं आश्वासन दिलं. परंतु जिथे पोहोचल्यानंतर ब्लाहने सिनेमांबाबत चर्चा केली आणि मला स्वत:मध्ये काही बदल करण्याचा सल्लाही दिला, जसे की कपड्यांची आणि केसांची स्टाई. ब्लाहने मला सेक्सबाबत फ्री राहण्यास सांगताना माझ्या शरीराला स्पर्श करु लागला. यानंतर मला बेडरुम नेलं आणि बलात्कार केला."

जॅकी भगनानीवर छेडछाडीचा आरोप
मॉडेलने आरोप केला आहे, ती अजित ठाकूर नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात होती, जो तिला अनेक पार्टींमध्ये घेऊन जात होता, जिथे तिची अनेकांसोबत भेट होत असे. "सप्टेंबर 2018 मध्ये जॅकी भगनानीच्या घरात पार्टी होती, तिथे ठाकूरने मला बोलावलं होतं. या ठिकाणी एक संगीतकार येणार होते, ज्याला मला भेटायचं होतं. जॅकीच्या घरी पोहोचल्यानंतर तो मला आपलं घर दाखवू लागला आणि मग कोणीही नसलेल्या ठिकाणी घेऊन गेला. जॅकी अश्लील चाळे करुन माझ्या शरीरालाही हात लावू लागला."

निखिल कामतवरील आरोप
"2015 मध्ये निखिल कामत माझ्या संपर्कात आला, कामतने मला निर्मात्यासोबत भेट घडवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. कामतने मला लोअर परेलला बोलावलं, मी तिथे गेले. तिथे बॉलिवूडमधले अनेक कलाकार आले होते. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यावेळी मी ड्रिंक घेत होते. कामतच्या हॉटल रुममध्ये प्रत्येक जण ड्रिंक करत होते आणि कोणीतरी माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्ज टाकलं. पार्टी संपत असतानाच कामतने मला घरी सोडतो असं सांगितल्याने मी थांबले. सगळे गेल्यानंतर कामतने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण मी तिथून निघून गेले," असा आरोप मॉडेलने केला.

शील गुप्तावर आरोप
"कामतच्या माध्यमातून माझी शील गुप्ताशी ओळख झाली. मे 2015 मध्ये गुप्ताने माझ्याशी संपर्क केला आणि अंधेरी परिसरातील एका पार्टीत बोलावलं, जिथे फार कमी लोक होते आणि ते ड्रिंक करत होते. यानंतर शील माझ्याजवळ आला आणि माझ्याशी छेडछाड करु लागला. यानंतर मी तिथून काढता पाय घेतला."

अजित ठाकूरवर गंभीर आरोप
"गुप्ताच्या माध्यमातून माझी ओळख अजित ठाकूरसोबत झाली. मार्च 2018 मध्ये ठाकूरने माझ्याशी संपर्क केला आणि म्युझिक तसंच सिनेमा साईन करण्यास सांगितलं. मी त्याला भेटण्यासाठी बीकेसीमध्ये परंतु अजित ठाकूरने मला विलेपार्लेला बोलावलं. इथे त्याने मला जबरदस्तीने कोकेन देत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु कसंबसं मला तिथून निसटता आलं."

गुरजोत सिंहनेही छेडछाड केली
अजित ठाकूर आणि शील गुप्ता यांचा मित्र गुरजोत सिंहने जून 2018 मध्ये गाण्याच्या रेकॉर्डिंसाठी मला वीरा देसाई अंधेरी इथे बोलावलं. तिथे पोहोचल्यानंतर त्याने माझ्याकडे अल्बम बनवण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी केली. त्यानेही शरीराला स्पर्श करत छेडाछाडीचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथून मी बाहेर पडले.

कृष्ण कुमारवर आरोप
ठाकूरच्या माध्यमातून माझी ओळख कृष्ण कुमारसोबत झाली होती. 2018 मध्ये कृष्णकुमारच्या अंधेरीतील ऑफिसमध्ये गाण्यासाठी गेले होते. कृष्णकुमारला माझं गाणं आवडलं आणि त्याने हिंदीत गाण्यास सांगितलं. यानंतर आमच्यात गाण्याबाबत चर्चा झाली. मग लोअर परेलमध्ये एका क्लबमध्ये झालेल्या पार्टीत कृष्णकुमारने माझं चुंबन घेण्याचा आणि छेडछाडीचा प्रयत्न केला.

विष्णु वर्धान इंदुरीवर आरोप
मॉडेलने पोलिसांना सांगितलं की, "2019 मध्ये माझी ओळख विष्णु वर्धान इंदुरीसोबत झाली होती. मी त्याला अनेक पार्टींमध्ये भेटले होते. अशाच एका पार्टीत त्याने मला आपल्या रुममधअये बोलावून जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला नकार दिल्याने इथे हे सगळं करावं लागतं असं उत्तर त्याने दिलं."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget