एक्स्प्लोर

उसके साथ जीने का एक मौका दे दे.. अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी ट्विस्ट

मुंबई : नवोदित भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तवच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आत्महत्येची केस दाखल केली असली, तरी अंजलीच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अंजलीची आई सोमवारी रात्री उत्तर प्रदेशहून मुंबईत दाखल झाली. त्यावेळी तिने डी. एन. नगर पोलिसांकडे अंजलीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. फोनवर शेवटचं बोलणं झालं, त्यावेळी ती खुश तर होतीच, पण पुढच्या महिन्यात होणारं नातेवाईकाचं लग्न आणि वाढदिवसाच्या तयारीला लागली होती. त्यामुळे 24 तासांत ती आत्महत्या कशी करेल, असा प्रश्न तिच्या आईनं उपस्थित केला. " उसके साथ जीने का एक मौका दे दे ऐ खुदा तेरे साथ तो हम मरने के बाद भी रह लेंगे | " 8 जूनला फेसबुकवर लिहिलेली अंजलीची ही शेवटची पोस्ट. यातच अंजलीच्या मृत्यूचं गूढ पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अंजलीच्या आई शीना श्रीवास्तव यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न 1. अंजलीचा मृतदेह ज्या खोलीत आढळला, त्या दरवाजाची कडी आतून बंद नव्हती 2. अंजलीने पंख्याला गळफास लावला असेल, तर पंखा आणि बेडमधील अंतर पाहता तिचे पाय बेडला लागण्याची शक्यता आहे 3. अंजलीच्या खोलीतून सुसाईड नोट मिळालेली नाही, किंवा तिने आत्महत्या केल्याचा ठोस पुरावा नाही. महिन्याभरापूर्वी शीना या अंजलीसोबतच मुंबईत राहत होत्या. त्या काळात अंजलीला डिप्रेशनही आलं नव्हतं, किंवा तिला आर्थिक चणचणही नव्हती. तिच्या प्रियकरासोबतच्या नात्यात ताणतणाव असल्याचंही तिने कधी आपल्याला सांगितलं नसल्याचा दावा, शीना यांनी केला आहे.

मुंबईत 29 वर्षीय अभिनेत्री अंजली श्रीवास्तवचा गळफास

अंजलीचे नातेवाईक तिला वारंवार फोन करत होते, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी घरमालकाशी फोनवरुन संपर्क साधला. घरमालकाने डुप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा उघडला असता अंजली साडीने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घरमालकाने तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. अंजली अंधेरीतील जुहू परिसरातल्या परिमल सोसायटीत राहत होती. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अहवाल आहे. पोलिस सध्या अंजलीचे मित्र-मैत्रिणी आणि फोन रेकॉर्ड तपासून प्रेम प्रकरणाबाबत तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget