एक्स्प्लोर
Advertisement
अभिनेत्रीचा पोलिस स्टेशनमध्ये राडा
मुंबई : वांद्रे पोलीस ठाण्यात एका अभिनेत्री आणि मॉडेलने चांगलाच राडा घातला. काही दिवासांपूर्वीच या मॉडेलने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आरोपीला अटक केल्याचं मॉडेलला समजलं. त्यानंतर तीने तातडीने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. इथे तीने थेट आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
पोलिस स्टेशनमध्ये मॉडेलने महिला पोलिसांशी हुज्जत घातली. अल्ताफ मर्चंटने बलात्कार केल्याची तक्रार या मॉडेलने केली होती. मर्चंट हा मनसेचा नेता असल्याचंही म्हटलं होतं. मर्चंटला थप्पड मारण्यासाठी मॉडेल आटापिटा करत होती. अल्ताफला कोर्टात नेण्यात येत होतं. मात्र त्याचवेळी हा सर्व राडा झाल्याने पोलिसांची दमछाक झाली.
महिला पोलिसांनी मॉडेलला अडवून ठेवल्यानंतर, अल्ताफला गाडीत घालून कोर्टात नेण्यात पोलिसांना यश आलं.
हिंदी सिनेमा आणि मॉडेलिंग करणाऱ्या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी मनसे नेता आणि सिनेनिर्माता अल्ताफ मर्चंटवर बलात्काराचा आरोप केला होता. इतकंच नाही तर ड्रग्ज देणं आणि अश्लिल फिल्म बनवल्याचा आरोपही मॉडेलने केला होता.
सिनेमांमध्ये काम देण्याच्या आमिषाने हा आरोपी मॉडेल्स मैत्री करतो, असा आरोप तक्रारदार मॉडेलने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement