![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mukesh Ambani Nita Ambani : भर रस्त्यात ट्रॅफिक सिग्नलवर केलं प्रपोज..; वाचा देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची फिल्मी लव्हस्टोरी
Mukesh Ambani Proposed Nita Ambani Love Story : मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांना रस्त्यात एका सिग्नलवर प्रपोज केलं होतं. त्यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.
![Mukesh Ambani Nita Ambani : भर रस्त्यात ट्रॅफिक सिग्नलवर केलं प्रपोज..; वाचा देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची फिल्मी लव्हस्टोरी Mukesh Ambani Nita Ambani Love story Asia Richest Man Mukesh Ambani Proposed Nita Ambani on Road Traffic Stopped Car Know Marriage Incident Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Mukesh Ambani Nita Ambani : भर रस्त्यात ट्रॅफिक सिग्नलवर केलं प्रपोज..; वाचा देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची फिल्मी लव्हस्टोरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/18/5edb857f47240bbc9540a5bd576e58071710731285064254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mukesh Ambani Nita Ambani : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांना रस्त्यात एका सिग्नलवर प्रपोज केलं होतं. त्यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.
मुकेश अंबानींनी 'असं' केलेलं नीता अंबानींना प्रपोज (Mukesh Ambani Proposed Nita Ambani)
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल खुलेपणाने भाष्य केलं होतं. त्यावेळी नीता यांनी मुकेश अंबानी यांनी त्यांना कसं प्रपोज केलं होतं ते सांगितलं. नीता अंबानी म्हणाल्या,"आम्ही कारने पेडर रोड परिसरात जात होतो. त्यावेळी रात्री 8 वाजताच्या दरम्यान रस्त्यात आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं होतं. दरम्यान मुकेश अंबानी यांनी रस्त्यातमध्येच गाडी थांबवली. त्यांनी अचानक गाडी का थांबवली हे मला कळेना आणि त्यांनी लगेचच मला लग्नाची मागणी घातली. आम्ही भेटून काहीच दिवस झाले होते तरी मी त्यांना 'कदाचित' असं उत्तर दिलं. पुढे ते म्हणाले,"हो किंवा नाही असं उत्तर दे आणि आता तुझं जे काही उत्तर असेल ते ऐकल्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही".
View this post on Instagram
नीता अंबानी मुकेश अंबानींना काय म्हणालेल्या?
नीता अंबानी म्हणालेल्या,"मुकेश अंबानी यांनी सिग्नलवर प्रपोज केलं. पण पुढे मी उत्तर देणार नाही तोपर्यंत ते गाडी पुढे जाणार नाही, असं म्हणाले. दुसरीकडे सिग्नल सुटला. मागच्या गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवत होते. त्यामुळे लगेचच त्यांना माझा होकार कळवला". मुकेश अंबानी पुढे म्हणाले, त्यावेळी काही वेळाने नीता अंबानींनी मला विचारलं,"जर मी नकार दिला असता तर तुम्ही मला कारमधून खाली उतरवलं असतं का?". तेव्हा मुकेश अंबानींनी उत्तर दिलं होतं,"नाही, मी असं कधीच केलं नसतं. मी तुला तुझ्या घरी सोडलं असतं आणि आपण एकमेकांचे चांगले मित्र म्हणून राहिलो असतो".
नीता अंबानी-मुकेश अंबानी यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा
मुकेश अंबानी यांनी प्रपोज करायच्या 15 दिवस आधी नीता अंबानी आणि त्यांची भेट झाली होती. धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) आणि कोकिलाबेन अंबानी (Kokilaben Ambani) यांनी नीता अंबानी यांना एका सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स करताना पाहिलं होतं. पहिल्या भेटीतच त्यांना नीता अंबानी सून म्हणून पसंत पडल्या होत्या.
धीरूभाई अंबानी यांनी पुढे नीता अंबानी यांच्या घरी फोन केला. त्यावेळी नीता अंबानी यांनीच तो फोन उचलला होता आणि त्यांना तो प्रैंक कॉल आहे, असं वाटलं. त्यावेळी मला तुमच्यासोबत काही बोलायचं नाही, असं म्हणत नीता अंबानी यांनी फोन कट केला. पुन्हा कॉल आल्यावर नीता अंबानी यांचे वडील रविंद्रभाई दलाल यांनी तो उचचला. पुढे त्यांनी रविंद्रभाई यांनी त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं.
संबंधित बातम्या
Mukesh Ambani : राधिका की श्लोका? अंबानींची कोणती सून सर्वाधिक श्रीमंत? कमाईत बॉलिवूड अभिनेत्री आसपास नाहीत!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)